nagar beed parli railway line status

ताज्या बातम्या

बहुप्रतीक्षित आष्टी नगर रेल्वेचे 23 सप्टेबरला उद्घाटन

By admin

September 12, 2022

 

अहमदनगर

nagar beed parli railway line status आष्टी- नगर दरम्यान नव्याने सुरुवात होणारी रेल्वे 23 सप्टेबरला रोजी सुरु  होणार आहे.या रेल्वेचे उद्घाटन करण्यासाठी खुद्द  केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होत आहे( beed railway latest news)

रेल्वे निर्माण विभागाच्या वतीने या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरु आहे.यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. रेल्वे मंत्रालयाने मंत्र्यांचा अधिकृत दौरा जारी केला आहे.

नगर आष्टी रेल्वे सुरु होणार असल्याने आष्टी तालुक्यातील नागरिक अधिक उत्सुक आहेत. कधी सुरु होणार असा प्रश्न येथील नागरिकांना होता. यापूर्वी अनेक वेळा घोषणा होऊन मात्र उद्घाटने लांबणीवर पडले होते .प्रत्यक्षात ती सुरु होण्याचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.

  नगर बीड परळी रेल्वे ( new railway line in Maharashtra ) मार्ग व्हावा ही अनेक वर्षाची मागणी मंजूर झाली. आष्टी ते नगर रेल्वे  प्रत्यक्षात धावणार असून त्यासाठीची तयारी युद्ध पातळीवर सुरु आहे.

 

nagar beed parli railway line status :

 

त्यासाठी अहमदनगर रेल्वे विभागाच्या वतीने जोरदार तयारी सुरु आहे. काही महिन्यापूर्वी  या ट्रकची  रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण तपासणी करण्यात आली. या ट्रकवर १२० प्रती तास वेगाने मोठी रेल्वे धावली. त्यामुळे या ट्रक वरील रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगर बीड परळी रेल्वे मार्गावरील आष्टी पर्यंतचे पूर्ण काम झाले आहे.आष्टी,कडा, सोलापूरवाडी आणि नारायणडोह हे स्टेशन पूर्ण झाले आहेत. ( Ahmednagar railway station )

या रेल्वे मार्गासाठी दिवंगत खासदार केशरकाकू क्षीरसागर, स्वर्गीय माजी मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी प्रयत्न केले होते . नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध  झाला आणि या कामाने गती घेतली.अहमदनगर ते आष्टी या ६१ किलोमीटर अंतरावर लोहमार्गाचे काम ही पूर्ण झाले आहे .

नगर ते नारायणडोह पर्यंत 17 मार्च 2018 रोजी सात डब्याच्या रेल्वेची चाचणी झाली होती . नंतर नगर – नारायणडोह – सोलापूरवाडी या 15 किमी अंतरावर दिनांक 25 फेब्रुवारी 2019 रोजी 7 डब्याची रेल्वे चाचणी झाली. त्यानंतर गेल्या 29 डिसेंबर रोजी नगर ते आष्टी दरम्यात चाचणी झाली. (nagar beed parli railway route map ) आता नियमित रेल्वे सुरु होण्याची प्रतीक्षा आहे. या रेल्वे मार्गामुळे बीड जिल्ह्यातील भाग नगरला जोडला जाणार आहे.