महात्मा फुले कृषि विद्यापीठाला आंबा विक्रीतून मिळाले 1 कोटी 84 लाखाचे विक्रमी उत्पन्न

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

राहुरी विद्यापीठ

         mpkv rahuri bumper mango production  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील बियाणे विभाग व उद्यानविद्या विभागाच्या रोपवाटिकेच्या प्रक्षेत्रावरील आंबा फळांच्या लिलावातून विक्रमी 1 कोटी 84 लाखाचे उत्पन्न विद्यापीठाला मिळाल्याची माहिती बियाणे विभागाचे प्रमुख तथा कुलसचिव डॉ. नितीन दानवले यांनी दिली.

 बियाणे विभागाच्या प्रक्षेत्रावरील अ/ब विभाग, मध्यवर्ती रोपवाटिका, ई विभाग प्रक्षेत्र यावरील 6,126 झाडे व उद्यानविद्या विभागांतर्गत असलेल्या रोपवाटिकेच्या प्रक्षेत्रावरील 3,071 झाडे अशा केशर, लंगडा, वनराज, तोतापुरी या आंबा फळ वाणांची ई-निविदा प्रणालीने विक्री करण्यात आली. 

शक्तिपीठ महामार्गाला बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा विरोध

बियाणे विभागांतर्गत असलेल्या प्रक्षेत्रावरील झाडांपासून 1 कोटी 13 लाख व उद्यानविद्या विभागाच्या रोपवाटिकेतील आंबा फळझाडांपासून 71 लाख असे एकूण 1 कोटी 84 लाखांचा महसूल विद्यापीठाला मिळाला आहे. विद्यापीठाकडील आंबा चवीष्ट व गुणवत्तापूर्ण असल्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर येथील व्यापार्‍यांनी खरेदीसाठी मोठा प्रतिसाद नोंदवला. 

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांचे मार्गदर्शनाखाली व बियाणे विभागाचे प्रमुख तथा कुलसचिव डॉ. नितीन दानवले यांच्या नियोजनात सर्व प्रभारी अधिकारी यांनी योग्य वेळेत खते, औषध फवारणी, व फळधारणेच्या काळात योग्य  पाण्याची व्यवस्था केल्यामुळे झाडांना चांगल्या प्रकारची फळधारणा दिसून आली. 

त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात व्यापार्‍यांची आंबा बागा खरेदीसाठी चढाओढ निर्माण झाली. विद्यापीठाचे नियंत्रक श्री. सदाशिव पाटील यांनी ई- निविदा उघडताना योग्य त्या लेखासंहितेचा अवलंब करून अचूक मार्गदर्शन केले. डॉ. नितीन दानवले यांच्या नियोजनाखाली मध्यवर्ती रोपवाटिका प्रभारी अधिकारी प्रा. मंजाबापू गावडे, ई विभागाचे प्रभारी अधिकारी प्रा.एस.व्ही पाटील व अ/ब विभागाचे प्रभारी अधिकारी श्री. प्रवीण बन तसेच उद्यानविद्या विभागांतर्गत असलेल्या रोपवाटिकेचे प्रमुख डॉ. सचिन मगर यांनी आंबा फळ उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न केले. 

आंबा फळांची योग्य वेळेत विक्री होण्यासाठी प्रा. बी.टी. शेटे, डॉ. के.सी. गागरे, डॉ. रश्मी भोगे, डॉ. माने, श्री. अभिजीत सांगळे, सौ. संगीता माने व संदीप कोकाटे यांनी योग्य व अचूक नियोजन केले.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles