मंतीमंद मुलीवर चौघा नराधमांचा अत्याचार;तिघे जेरबंद

- Advertisement -
- Advertisement -

राजेंद्र जैन / कडा

Mental Retarded Girl raped by four in beed तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गावामध्ये एका २५ वर्षीय मतीमंद, मुकबधीर मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याची घटना शुक्रवार दि.४ रोजी उघडकीस आल्याने खळबळ उडाली.

या संदर्भात अंभोरा पोलिस ठाण्यात चार जणांविरुध्द पोउपनि देवीदास सातव यांच्या फिर्यादीवरुन गुरनं -२४६/२०२४ कलम-६४ (२) (आय)(जे) ७०भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अंभोरा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शुक्रवार दि.४ रोजी सपोनि मंगेश साळवे यांना एका गावामध्ये २५ वर्षीय मतीमंद, मुकबधिर मुलीवर बलात्कार झाला असल्याची गोपनीय माहिती फोनवरुन मिळाली.

त्या अनुषंगाने सपोनि साळवे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोउपनि देवदास सातव, पोलिस अंमलदार सुदाम पोकळे यांना घटनास्थळी पाठवले, तेथून २५ वर्षीय मतीमंद, मुकबधीर मुलीसह तिच्या आईकडीलांना पोलिस ठाण्यात आणून त्यांना घडलेल्या घटनेची माहिती देऊन तक्रार नोंदवणेबाबत सांगीतले. मात्र पिडीतेच्या आईवडीलांनी तक्रार देण्यास नकार दिला.

सदर घटनेची माहिती सपोनि साळवे यांनी पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कमलेश मिना यांना दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिडीतेची तात्काळ बलात्काराच्या अनुषंगाने वैद्यकीय तपासणी करुन सरकार तर्फे पोउपनि देवीदास सातव यांच्या फिर्यादीवरुन अंभोरा पोलिसात चौघाच्या विरोधात गुरनं -२४६/२०२४ कलम-६४ (२) (आय)(जे) ७०भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरचा गुन्हा हा अत्यंत संवेदनशील गंभीर स्वरुपाचा असल्याने या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना गजाआड करण्यासाठी सपोनि साळवे, पोउपनि सातव, पोलिस हवालदार मुकूंद एकसिंगे, बाबुराव तांदळे, भरत माने, संतोष राठोड, मनोज खंडागळे, महिला पोलिस छाया साप्ते, पोना अमोल ढवळे, प्रशांत कांबळे, पोलिस अंमलदार शिवदास केदार, सतीश पैठणे, अमोल सिरसाठ, सुदाम पोकळे, चालक पडवळ यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेऊन या गुन्ह्यातील दोघा जणांच्या अवघ्या दोनच तासातच मुसक्या आवळून गजाआड केले असून, उर्वरित फरार दोघांचा शोध घेण्यासाठी विशेष पोलिस पथक नेमण्यात आल्याचे सपोनि मंगेश साळवे यांनी सांगीतले.

अवघ्या दोन तासात तिघे नराधम गजाआड.

अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका पंचवीस वर्षीय मतीमंद, मुकबधीर मुलीवर लैगीक अत्याचाराची घटना घडल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच, सपोनि मंगेश साळवे व त्यांच्या टिमने सदर गुन्ह्याची संवेदनशीलता व गांभीर्ण लक्षात घेऊन तात्काळ आरोपींच्या दिशेने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या दोन तासात या गुन्ह्यातील चौघा आरोपींपैकी तिघांच्या मुसक्या आवळून गजाआड करण्याची किमया साधल्याने अंभोरा पोलिसांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेचे नागरीकांतून स्वागत होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles