जालना:
Medical team and police raid illegal gender diagnosis and illegal abortion center जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात केंद्रावर वैद्यकीय पथक आणि पोलिसांनी आज सायंकाळी छापा टाकाला.
या ठिकाणी एका गरोदर महिलेचे अवैधरित्या गर्भलिंग निदान केले जात असल्याचं समोर आलं आहे. डॉ. दिलीपसिंग राजपूत असं गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरचं नाव असून, तो बोगस डॉक्टर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र पाटील यांनी दिली. सदर कारवाई अद्याप सुरू असून वैद्यकीय पथकानं पोलिसांच्या मदतीनं गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन, दोन पोर्टेबल सोनोग्राफी मशिन राज्यभरातल्या एजंटच्या नावांच्या डायऱ्या, मोठी रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान, कारवाई सुरू असताना बोगस डॉक्टर दिलीपसिंग राजपूत हा फरार झाला आहे.