नियमबाह्य बेकायदेशीर परीक्षेला मराठवाडा शिक्षक संघाचा विरोध

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

छ. संभाजीनगर

Marathwada Teachers’ Union opposes illegal and irregular examinations मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात दिनांक 12 मार्च 2025 रोजी संस्थेअंतर्गत अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या अनुभवी शिक्षकांची 100 गुणांची परीक्षा आयोजित केलेली असून ही परीक्षा म्हणजेच शिक्षकांचा करण्यात येणारा अवमान होत आहे

ही परीक्षा शिक्षकांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेच्या विरोधात आहे तसेच हा कायद्याचा आणि नियमाचा भंग आहे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील अनेक शिक्षक कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला आहे.

हा अपमान शिक्षक कर्मचारी कदापिही सहन करणार नाही तरी या परीक्षा मंडळाने न घेता शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठी संस्था अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करावे जेणेकरून शिक्षकांच्या गुणवत्तेमध्ये निश्चितच वाढ होईल.

परंतु मंडळाने नियमबाह्य बेकायदेशीर या परीक्षांचे आयोजन करून शिक्षकांना मानसिक त्रास व शिक्षकांच्या आत्मसन्मानावर आघात करण्याचे कार्य केलेले आहे तरी या परीक्षा तात्काळ रद्द करण्यात याव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने आपल्या संस्थेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल .

असा इशारा मराठवाडा शिक्षक संघाचे छत्रपती संभाजीनगर चे (जिल्हा सचिव) भाई चंद्रकांत चव्हाण यांनी दिलेला आहे यांच्या नेतृत्वाखाली आज संस्था कार्यालयात संस्था पदाधिकारी त्रिंबकभाऊ पार्थिकर व प्रशासकीय अधिकारी एफ. एम. माळी सर यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी यावेळी संघटनेचे पदाधिकारी योगेश खोसरे विनोद केणेकर, अशोक ढमढेरे, विलास चव्हाण, दीपक वाघ, बाळू पवार, संतोष सुरडकर, नवनाथ मंत्री अजय कदम, विलास चांदणे, पद्माकर पगार, शितल कडवे, अरुणा चौधरी, सविता हिंगे, मानसी भागवत उपस्थित होते.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,300SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles