जरांगेंचे उपोषण स्थगित,सरकारला 1 महिन्याचा वेळ

20240611 125327




अंतर वाली सराटी,

Manoj jarange patil uposhan stayed जरांगे पाटील यांच्या भेटीला सरकारच्या शिष्टमंडळात खासदार संदीपान भूमरे,मंत्री शंभूराज देसाई अंतर वाली सराटी येथे आले होते.
त्यांची जरांगे यांच्याशी चर्चा झाली असून शंभूराज देसाई यांनी 1 महिन्यात सगेसोयरेर्यांच्या मागणी सह जरांगे यांनी सरकार कडे दिलेल्या मागण्यांवर निर्णय होणार असल्याचा शब्द दिल्यावर मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण स्थगित केले आहे. यावेळी छत्रपती संभाजी नगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे, राणा जगजितसिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सरकार सग्या सोयर्यांच्या कायद्याबद्दल सकारात्मक असून सरकारचे प्रतीन8धी म्हणून 1 महिन्यात या विषयावर निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी उपस्थित जनसमुदाय समोर दिल्यावर उपस्थितांनी एक मराठा लाख मराठयांचा घोष केला.
सरकार ला यामुळे 13 जुलै पर्यंतचा वेळ मिळाला असून या दरम्यान ते आपला शब्द पुरा करतील अशी अपेक्षा जरांगे यांनी व्यक्त केली. यानंतर खालावलेल्या तब्येतीमुळे जरांगे यांन उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथे हलविण्यात आले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here