मराठा आरक्षण गावबंदीचा भाजपचे नेते नंदकिशोर मुंदडा यांना फटका

- Advertisement -
- Advertisement -

केज, दीपक नाईकवाडे…

manoj jarange patil gavbandi effect मराठा आरक्षण मागणीचा फटका लोकसभेतील नेत्यांना आणि प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना बसणार आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर गावोगावी होणार्या धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक कार्यक्रमात कार्यकर्त्यांची उठबस सुरु झाली आहे. त्यामुळे आता गावागावातील मराठा आरक्षण आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील त्यांचे कार्यकर्ते पुढे येत आहेत. ते आता मराठा आरक्षणाच्या भूमिकेवर नेत्यांना घेरत असल्याचे चित्र दिसत आहेत.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उंदरी गावात असाच प्रकार घडला. केज विधानसभेच्या आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे आणि भाजपचे नेते नंदकिशोर मुंदडा यांना या गावातील मराठा आरक्षण कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

बीडमध्ये मतदान चौथ्या टप्प्यात ;13 मे ला मतदान

मुंदडा यांचे आगमन येथे गावातील हरीनाम सप्ताह सुरु असलेल्या मंदिराजवळ होताच कार्यकर्त्यांनी गाडी अडवून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत त्यांना विरोध करण्यात आला. यावेळी गावातील नागरिकांनी मध्यस्थी करत त्यांची गाडी पुढे काढून दिली. यावेळी मुंदडा यांनी आपण परळी कडे जात असल्याचे सांगून आपल्याला का अडविण्यात आले याबाबत उपस्थितांना जाब विचारला. यावेळी ते चांगलेच संतापलेले पहावयास मिळाले.

लोकसभेचे बिगुल वाजले आहे. बीड जिल्ह्यात भाजपच्या वतीने माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी घोषित केली आहे. सध्या बीड जिल्ह्यातील गावागावात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नेत्यांना गावबंदी असल्याचे फलक गावाच्या वेशीवरच झळकत आहेत. या गावाच्या निर्णयाच्या फटका गावात येणाऱ्या राजकीय नेत्यांना बसत आहे. आगामी काळात हा संघर्ष वाढणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles