बीड जिल्हा संतांची भूमी आहे, आमच्या बीड मध्ये, आमच्या महाराष्ट्रात असं कधी झालं नाही.*
ओबीसींच्या दुकानावर जाऊ नका, वंजाऱ्यांच्या दुकानात जाऊ नका असं आम्ही कधीच म्हणणार नाहीत.बीड मधील वंजारी समाजाच्या ठरावावर मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया.
ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात ओबीसींचा उमेदवार आहे, तिथे तिथे तुम्हाला मराठे प्रश्न विचारणार- मनोज जरांगे. मराठा समाजाने शांत राहावे, जरांगेयांचे आवाहन.
जातीय तेढात काही मजा नसून ती थोडी हवा असते, जरांगे यांची टीका.
jalna,
Manoj Jarange Patal’s reaction to the resolution of Vanjari community in Beed बीड जिल्हा संतांची भूमी आहे. आमच्या बीड मध्ये, आमच्या महाराष्ट्रात असं कधी झालं नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिलीय. ओबीसींच्या दुकानावर जाऊ नका, वंजाऱ्यांच्या दुकानात जाऊ नका असं आम्ही कधीच म्हणणार नसल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
बीड मध्ये वंजारी समाजाने मराठा समजाकडून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा अजब ठराव घेतलाय. त्यावर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिलीय. एवढा जातीय तेढ निर्माण करायला तुम्हाला एवढं काय झालं असा सवाल मनोज जरांगे यांनी केलाय. 13 तारखे पर्यंत मराठे चांगले होते, 13 तारीख संपली की मराठे वाईट झाले? मराठ्यांनी तुमचं काम नाही केलं का?
महाराष्ट्रातील कोणताही ओबीसीचा उमेदवार उभा असू द्या, मराठा समाजाने कामं नाही केलं का? ज्या मराठ्यांच्या आमदाराने ओबीसींच्या उमेदवारांचे कामं केले ते यासाठी केले का असे प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केलाय. मराठा समाज प्रश्न विचारणार आहे.
ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात ओबीसींचा उमेदवार आहे, तिथे तिथे तुम्हाला मराठे प्रश्न विचारणार असल्याचं जरांगे म्हणालेत. मराठा समाजाने शांत राहावे असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलय. जातीय तेढात काही मजा नसून ती थोडी हवा असते अशी टीका जरांगे यांनी यावर केलीय.