जालना
Manoj Jarange appeals Maratha community 25 जानेवारी ला राज्यातील सगळ्या मराठ्यांनी अंतरवाली सराटी मध्ये उपोषणाला पाठींबा देण्यासाठी यायचं असे आवाहन मनोज जरांगें यांनी मराठा समाजाला केले आहे.
अंतरवाली सराटीत मधील स्थगित झालेलं आमरण उपोषण 25 जानेवारी 2025 रोजी पुन्हा सुरू होणार आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी या संदर्भातील मोठी घोषणा केलीय. जालन्याच्या अंतरवाली सराटीत आज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी ते बोलत होते. सामूहिक आमरण उपोषणाला 25 जानेवारी 2025 रोजी अंतरवाली सराटीत सुरुवात होणार असून सरकारने 25 जानेवारी 2025 च्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात असं जरांगे म्हणालेत.
25 जानेवारी ला राज्यातील सगळ्या मराठ्यांनी अंतरवाली सराटी मध्ये उपोषणाला पाठींबा देण्यासाठी यायचं असं आवाहन देखील जरांगेंनी मराठा समाजाला केलंय. उपोषणाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझे प्रचंड हाल होणार असं म्हणत या उपोषणात माझा शेवट पण होऊ शकतो अशी भीती जरांगे यांनी व्यक्त केलीय.
दरम्यान सरकारला झुकवल्याशिवय मराठ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी थांबणार नाही असं जरांगे यांनी म्हटलंय.