maneater bibtya

ताज्या बातम्या

नरभक्षक बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद

By admin

December 07, 2022

 

 

अकोले,

maneater bibtya कोकणवाडी येथे वृध्द महिलेस ठार करणाऱ्या नरभक्षक बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला आहे.

गेली पंधरा दिवसापासून निळवंडे धरण व राजूर परिसरात एका नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला होता .

राजूर येथे कुत्रे,शेळ्या,बोकड ,कोंबड्या याचा फडशा पडत हा बिबट्या मानव वस्तीत घुसून दहशत निर्माण करत होता वनविभागाने त्याला पकडण्यासाठी पाच पिंजरे लावले होते .

मात्र तो हुळकवण्या देत पिंजऱ्यात अडकण्यास तयार नव्हता मात्र राजूर वनक्षेत्रपाल जयश्री साळवे व त्यांच्या कर्मचारी यानी निळवंडे रस्त्यावर उसात पिंजरा लावून त्यात कोंबड्या सोडून त्यास रात्री आठ वाजता जेरबंद केला.

या बिबट्यास सुगाव नर्सरी मध्ये नेऊन ठेवण्यात आला आहे.मात्र अजूनही दोन बिबटे या परिसरात वावरत असून परिसरातील शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आव्हान वनक्षेत्रपाल श्रीमती साळवे यानी केले आहे.

बुधवारी रात्री भाजपचे युवा अध्यक्ष अक्षय देशमुख ,यांनी वन कर्मचारी यांना मदत केली तर पिंजरा लावावा अशी त्यांची आग्रही मागणी होती.

नर जातीचा हा बिबट्या आक्रमक होता मोठ्या डरकाळ्या फोडून त्याने परिसर दुमदुमून टाकला होता.