अकोले,
Mahila din akole 2025 क्षितीज फाउंडेशन नवलेवाडी या सेवाभावी संस्थेच्या वतीने महिला दिनांचे औचित्य साधून धामणगाव आवारी येथील अनाथ , विधवा , परित्यक्ता एकल महिलांचे हिमोग्लोबीन, रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण इ .तपासणी शिबीर तसेच ४५ एकल महिलांना साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले.
२०२० मध्ये संस्थेने सेवाभावी वृत्तीने कामाची सुरुवात करून कर्णदोष तपासणी, रक्तदान शिबीर, वृद्ध अनाथांसाठी मदत, धुणीभांडी करणान्या गरजू महिलासाठी मदत वृद्धाश्रमासाठी दिवाळी भाऊबीज भेट, अशा अनेक कार्यक्रमातून सेवा भाव जपला आहे-
धामणगाव आवारीचे प्रथम नागरीक मा.सौ. पूनमताई आवारी, उपसरपंच मा. गणेश पापळ,निताताई आवारी, कविता पोटखरकर, भाग्यश्री आवारी मिनाताई पोखरकर (मा-सरपंच) स्वाती ताई पापळ जि.प. प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षिका, भारतरत्न राजीव गांधी विद्यालयाचा संपूर्ण शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. ह.भ.प सावित्राआई विद्यालय विठे ची विदयार्थिनी कुं. सानिका नारायण मोहटे हिने आपल्या मनोगताने उपस्थित्यांचे डोळ्यात अश्रू आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष्य स्थानी सौ. पूनम याळासाहेब आवारी होत्या. मी गणेश पापळ यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले सद्भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचलन संस्थेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर वैरागर यांनी केले. तर श्री पापळ सर यांनी आभार व्यक्त केले.