नवीन वर्षामध्ये सुमारे ३५०० लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील-मंत्री, भरतशेठ गोगावले यांची घोषणा

- Advertisement -
- Advertisement -

On Merit Besis

Maharashtra State transport bus fare hike 2025 सन. २०२५ मध्ये म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने सुमारे ३५०० नव्या साध्या ” लालपरी ” बसेस एसटी च्या ताफ्यात दाखल करण्याचा मनोदय एसटीचे अध्यक्ष व मंत्री भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला. मात्र याच बरोबर भाडेवाढ केली जाणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.

नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली. सध्या एसटीकडे बसेसची प्रचंड कमतरता आहे. एसटीच्या ताफ्यामध्ये आता १४ हजार बसेस असून करोना महामारीपूर्वी म्हणजे सन . २०१८ मध्ये एसटी कडे तब्बल १८ हजार बसेस होत्या. परंतु गेल्या ३-४ वर्षात करोना महामारी व इतर काही कारणामुळे एसटीला नव्या बसेस खरेदी करणे शक्य झाले नाही.

त्यामुळे ताफ्यात असलेल्या अनेक बसेस जुन्या झाल्यामुळे त्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच बसेसची कमतरता असल्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त बस फेऱ्या देणे शक्य होईना. या सगळ्याचा विचार करून एसटीने स्वमालकीच्या २२०० बसेस खरेदी करण्याचा व १३०० बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या सुमारे साडेतीन हजार बसेस जानेवारी महिन्यापासून एसटीच्या ताफ्यात समाविष्ट व्हायला सुरू होईल. त्यामुळे नवीन वर्षामध्ये प्रवाशांना रस्त्यात बस नादुरुस्त होणे, बसेसची दोन, दोन तास वाट पाहत बसणे अशा तक्रारीला कमी होतील. असे प्रतिपादन गोगावले यांनी यावेळी केली.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, राज्यातील सर्व बस स्थानकाचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याची योजना महामंडळाने आखली असून, काही बस स्थानके ही शासनाच्या निधीतून तर काही बस स्थानके बांधा-वापरा -हस्तांतरीत करा या तत्त्वावर खाजगी विकासकांकडून विकसित केली जाणार आहेत.

मागील सरकारच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकाऱ्यांने राज्यभरातील १८३ बस स्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात झाली होती. त्याला आता गती प्राप्त झाली असून, नागपूर मधील गणेश पेठ बस स्थानकाचे काँक्रिटीकरण देखील याच टप्प्यात पूर्ण होत आहे.

भविष्यात विदर्भातील एक देखणं बस स्थानक म्हणून गणेश पेठ बस स्थानकाचा नावलौकिक होईल असा गौरव गोगवले यांनी यावेळी केला. बस प्रवासी यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी बसस्थानकाची सुधारणा बीओटी तत्त्वावर महामंडळ करणार आहे.

महामंडळाच्या जागा 60 वर्षासाठी लीझवर देण्याकरिता तसेच मुंबई सारख्या शहरातील मोक्याच्या जागा वापरण्यासाठी महामंडळ कार्यरत असून याद्वारे एसटीला चांगल्या प्रमाणात महसूल सुद्धा मिळणार असल्याची त्यांनी सांगितले .

एसटी प्रवास भाड्यामध्ये साडेचौदा टक्के वाढ प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितलं .यावेळी एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles