मुंबई
Maharashtra CM devendra fadanvis भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. यासंदर्भातील ठराव चंद्रकांत दादा पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला होता.
या कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहे.
भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी भाजपच्या निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवार चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे गिरीश महाजन आदी उपस्थित होते.