आष्टी ,
machindranath jatra 2025 maymba आष्टी तालुक्यातील सावरगांव (मायंबा)येथील मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीला जल अभिषेक घालण्यासाठी राज्यभरातून हजारो कावडी दाखल होऊन मायंबा येथे मच्छिंद्रनाथ समाधी सोहळा मोठ्या उत्साहात करण्यात आला.
सालाबाद प्रमाणे..याही वर्षी वर्षप्रतिपदेच्या पूर्वसंध्येला अमावस्ये निमित्त आष्टी तालुक्यातील सावरगाव (घाट) मायंबा येथे याही वर्षी श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान या ठिकाणी चैतन्य मच्छिंद्रनाथ (बडे बाबा) यांच्या संजीवन समाधी महोत्सवास विविध धार्मिक कार्यक्रमांनी सुरुवात झाली असून यानिमित्ताने चैतन्य मच्छिंद्रनाथांची समाधीला सुगंधी द्रव्य मिश्रित उटणे लेप लावण्याचा विधी होत असतो.
वर्षातून हा एकच दिवस हा विधी होत असल्याने भाविक भक्तांसाठी हा अपूर्व योग असतो याही वर्षी श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे या संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ झाला असून आमदार सुरेश धस यांनी या गडाचा विकास मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे भाविक भक्तांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत.
त्यामुळे भारतभरातून या ठिकाणी लाखो भाविक भक्तांनी आज उपस्थिती लावली असली तरी कोणत्याही प्रकारची अडचण नाही येऊ देता या सोहळ्यासाठी श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड विश्वस्त मंडळाने अत्यंत परिश्रमापूर्वक बारीक-सारीक बाबींची दक्षता घेऊन भाविकांच्या दर्शन रांगेसह अत्यंत चोखपणे व्यवस्था केली असल्यामुळे भारतभरातून आलेल्या लाखो भाविक
भक्तांनी अत्यंत शांतपणाने दर्शन घेतले या संजीवन समाधी सोहळ्या निमित्ताने लाखो भाविक भक्त उपस्थित राहणार असल्यामुळे पोलीस बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अधिपत्याखाली 40 पोलीस निरीक्षक साहेब निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांचे सह 300 पोलीस कर्मचारी 150 गृह रक्षक दलाचे जवान
आणि 150 पोलीसमित्र असा तगडा बंदोबस्त तैनात केलेला असल्यामुळे अत्यंत शांतपणे भाविक भक्तांना दर्शन घेता आले यानिमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली ही अत्यंत नेत्रदीपक झाली असल्यामुळे भाविक भक्तांनी अत्यंत आनंदाने नयनरम्य सोहळ्याचा आनंद लुटला.
https://www.facebook.com/share/v/1541Akh7fo
वर्षातून एकदाच फाल्गुन आमवस्येला शनिवार (दि.२९) (गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला)मायंबा येथे चैतन्य मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचा स्पर्श सोहळा पार पडला.श्रीक्षेञ पैठण येथील मच्छिंद्रनाथांची भव्य निशाण मिरवणूक संपल्यानंतर सांयकांळी सर्व नाथ भक्त पैठण येथून पायी मायंबाकडे प्रस्थान झाले.पैठण-शेवगांव-आमरापूर या मार्गी सुमारे 60
कि.मी.पायपीठ करत येतात.नाथ भक्तांनी आणलेल्या कावढी वेगवेगळ्या प्रकारे सजविल्याने भाविकांचे लक्ष वेधुन घेतले.मच्छिंद्रनाथांच्या समाधीला राञी दहाच्या सुमारास सुधंगी उटणे(मळी)लावण्यास सुरूवात झाली.प्रत्येक भाविकाला समाधीवर जलअभिषेक करण्याची संधी मिळते.स्थान करून ओल्या कपड्याने भाविक दर्शनबारीतून मंदिरात पोहचून
नाथांचा जयजय कार करत या उत्सवात सहभागी होत होता.भाविकांना मूळ दगडी शिळेचे दर्शन पाहटे पर्यंत घेता होते.दर्शन रांगेतील प्रत्येक भाविकाला स्वतःच्या हाताने समाधीस उटणे लावण्यात आले.मायंबा देवस्थान समितीच्या वतीने
दर्शन रांगेतच आंघोळीची सुविधा करण्यात आली होती.यावेळी देवस्थानचे विश्वस्त माजी राज्यमंञी आमदार सुरेश धस,अध्यक्ष दादासाहेब चितळे,सरपंच राजेंद्र म्हस्के,सचिव दादासाहेब म्हस्के,देवस्थानचे पीआरओ शेख जावेद यांच्यासह सर्व विश्वस्त गावकरी व संयोजन समितीने उकृष्ट नियोजन केले होते.