बीड
Lawrence Bishnoi threatens khokya alis satish bhosale जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील फरारी आरोपी खोक्या उर्फ सतीश भोसले याला आता थेट बिश्नोई गँगने धमकी दिली आहे.
पोलिसांनी या खोक्याला तात्काळ अटक करावी अन्यथा आम्ही तर त्याला मारणार आहोत असे या फेसबुक पेजवर देण्यात आलेल्या धमकीमध्ये म्हटले आहे.
बिश्नोई समाज हा हरीण काळवीट यांना संरक्षण देणार आहे. यापूर्वी चित्रपट अभिनेता सलमान खान यांनी काळवीटाची शिकार केल्याच्या कारणामुळे या बिश्नोई गँग ने सलमान खान याला मारण्याची धमकी दिली होती.
त्यानंतर हे प्रकरण खूप गाजले होते. त्यातच शिरूर तालुक्यातील खोक्या उर्फ सतीश भोसले यांनी हरणाची शिकार केल्याचे वनविभागाने टाकलेल्या छाप्यात दिसून आले आहे . त्याच्या घरी सापडलेल्या वस्तूमध्ये हरणाचे अवयव तसेच हरणे पकडण्यासाठी लागणारे जाळीही आढळून आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणांमध्ये लॉरेन्स बिश्नोई यांच्या नावाने तयार केलेल्या फेसबुक पेजवरून खोकला ही धमकी देण्यात आली आहे.
काय म्हटले आहे या पोस्ट मध्ये
बीड पोलीस से मेरी विनंती है की वहा के लोकप्रतिनिधी सुरेश धस के समर्थक सतीश भोसले को जल्दी से जल्दी गिरफ्तार किया जाये मै उसको शिक्षा दूंगा लेकिन आप जल्दी से जल्दी अंदर डाल दो उसने हमारे दैवत हरीन काळवीट प्राणी को शिकार करके उनका तस्करी किया है वो माफी लयक नही है जल्दी आप अपना काम करो