kunal kamra controversy over eknath shinde कुणाल कामरा विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले. संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असले तरी यातून दुसऱ्याला अपमानित करण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशा गोष्टी सहन करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
kunal kamra eknath shinde कुणाल कामरा हा एक कॉमेडीयन असून त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे तयार केले. हे गाणे समाज माध्यमावर आल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमठू लागल्या आहेत.
याबाबतचा मुद्दा समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिले. .
राजकीय व्यंग करताना त्याला दुसरा रंग देण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. २०२४ च्या निवडणुकीने राज्यातल्या जनतेने खुद्दार आणि गद्दार कोण हे स्पष्ट केले आहे, असं ते म्हणाले,
शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि कुणाल कामरा याच्या अटकेची मागणी केली. त्याने राज्यातले वातावरण दूषित केले आणि यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं खोतकर म्हणाले. त्याला मिळणारा निधी, त्याचे सूत्रधार शोधा, त्याचे कॉल रेकॉर्ड तपासा अशी मागणी त्यांनी केली.
मंत्री शंभूराज देसाई यांनी खोतकर यांच्या मागणीला सहमती दर्शवली. यानंतर सत्ताधारी सदस्यांनी अध्यक्ष समोरच्या जागेत येऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज ५ मिनिट साठी तहकूब केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवेदन केले.
कॉमेडियन कुणाल कामरा याने माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन परिसरात स्पष्ट केले.
संविधानाने स्वातंत्र्याचा अधिकार दिला असला तरी स्वैराचाराचा kunal kamra song अधिकार नाही. त्यामुळे कुणालाही अपमानित करण्याचा प्रकार सहन करणार नाही, असं ते म्हणाले.
राज्यातल्या जनतेने गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे स्पष्ट केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कोण चालवते आहे, हे देखील जनतेने ठरवल्याचे त्यांनी सांगितले