ताज्या बातम्या

कर्नाटक राज्य हे दुष्काळ जाहीर करण्याचे शक्यताKarnataka state declare drought

By post Editor

September 04, 2023

Karnataka state declare drought कर्नाटक राज्य हे दुष्काळ जाहीर करण्याचे शक्यता

Maharashtra महाराष्ट्रातही काही वेगळं नाही आहे पण महाराष्ट्र सरकार दुष्काळाबाबत अजून एक शब्द सुद्धा उच्चारायला तयार नाही आहे खरीप हंगाम बोंबलत गेलाय रब्बी पुढच्या पावसावर अवलंबून आहे मग काय करतं हाच प्रश्न पडतो कर्नाटक सरकारला जे जमतं हे आपल्या सरकारला का जमत नाही शेतकऱ्यांना सरकार अजून किती दिवस धरणार आहे आपल्या राज्यातली स्थिती नेमकी काय आहे याचा आढावा आपण या ब्लॉगमधून घेणार आहोत एक जून ते 30 ऑगस्ट या तारखे दरम्यान कर्नाटक राज्यामध्ये 26 टक्के पावसाची तूट आहे नाटक मध्ये 30 ऑगस्टपर्यंत 488 मिलिमीटर पावसाची नोंद झाली . याच पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्याच्या सरकारने दहा दिवसात पीक नुकसानीची जमा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत नुकसानाची माहिती माहिती झाल्यावर लगेच पुढच्या आठवड्यात दुष्काळ जाहीर करण्याचे संकेत कर्नाटकचे कृषिमंत्री एम चलोमुराई स्वामी यांनी गुरुवारी दिली आहे महाराष्ट्रातही पावसाने दळी दिली आहे अशी मागणी शेतकरी करत आहेत परंतु राज्य सरकार अजूनही दुष्काळाबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही राज्यात एक जून ते 31 ऑगस्ट दरम्यान अकरा टक्के पाऊस कमी झाला त्यामुळे खरीप पिकांनी माना टाकले आहेत जलाशयातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी टँकरची ही देखील सुविधा करण्यात आलेली आहे त्यासोबत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आलेला आहे मराठवाड्यातील केवळ 85 दिवसच पुरेल इतका चारा साठा आहे असं प्रशासनाने जाहीर केलेला आहे हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोकण आणि विदर्भामध्ये पावसाने सरासरी गाठली आहे परंतु त्यामध्ये कमी वेळात पडलेल्या जास्त पावसाचा मोठा वाट आहे ऑगस्ट सरला तरीही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पावसाने सरासरी इतकी ही हजेरी लावलेली नाही त्यातच सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरी पाऊसमान राहील असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे सभा घेण्यातच धुंद असल्याचे चित्र आहे त्यामुळे राजकीय हम्रातून दुष्काळाचे चित्र याच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार वारंवार शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार आहे असं सांगत असतात तर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्याचा पुत्र आहे असं म्हणतात व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असल्याचं असल्याचं बोलून दाखवतात परंतु राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता सरकार बद्दल शेतकऱ्यांच्या मनात शंका उपस्थित होऊ लागल्यात खरीप हंगामातील कापूस सोयाबीन तूर मूग उडीद या पिकांसह ऊस आणि फळबाग पावसा अभावी वाळून गेल्याचे शेतकरी सांगत आहेत खरीप हप्ता गेलेला आहे पुढील काळातील मान्सूनचा पाऊस कसा राहील यावरच रब्बी अवलंबून असेल परंतु हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेता राज्यात दुष्काळाची स्पष्ट संकेत हवामान विभागाने दिले आहेत राज्य सरकार दुष्काळ जाहीर करणार तरी ती कधी असा प्रश्न देखील शेतकऱ्यांना पडलेला आहे त्यासोबतच कर्नाटक सरकारला जे जमतं ते महाराष्ट्र Maharashtra सरकारला का जमत नाही असा प्रश्नही शेतकरी आता उपस्थित करत आहेत कर्नाटक मध्ये 31 पैकी 29 जिल्ह्यात ७०% पावसाची तूट आहे त्यामुळे कर्नाटक मधील 120 होऊन अधिक तालुके कोरडे पडल्याची स्थिती आहे पावसाच्या अभावी पिकांना पाण्याचा ताण पडत असल्याकारणाने पिक मान टाकत आहे असं कर्नाटक राज्याचे कृषिमंत्री एम शेलूवलय राय स्वामी यांनी सांगितले आहे तर हवामान विभागाचे आकडेवारीनुसार दक्षिण अंतर्गत कर्नाटकात पावसाची तूट तीस टक्के आहे तर किनारपट्टीच्या भागात 17 टक्के आणि उत्तर अंतर्गत कर्नाटक अकरा टक्के पावसाची तूट आहे त्यामुळे पिकांच्या नुकसानीची माहिती घेऊन कर्नाटक राज्य सरकार दुष्काळ जाहीर करण्याच्या तयारीत आहे राज्यातही जून महिन्यात 54 टक्के पावसाची तूट होती पावसाने सरासरी गाठली परंतु ऑगस्ट महिन्यात राज्यातील बहुतांश भागात पंधरा दिवस उघडीत होती खरीप पिक सुकू लागली आहेत अशातच दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे पण सरकार अजून थंडच दिसते .