केज / प्रतिनिधी :-
kaij santosh deshmukh murder case mla namita mundada सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे दोषींना कठोर शासन करण्याची मागणी करत केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी मस्साजोग येथे जात देशमुख कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे
तीन दिवसापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा निर्घृण खूण करण्यात आला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आ नमिता मुंदडा यांनी सर्व आरोपीना तत्काळ अटक करावी व याप्रकरणाची सर्व पाळेमुळे शोधून आरोपीना कठोर शासन करावे तसेच याचा तपास जलदगतीने करावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती दरम्यान काल आमदार नमिता मुंदडा व अक्षय मुंदडा यांनी मस्साजोग येथे जात मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले