कडा
kada road mishap 3 dies धामणगाव कडा रस्त्यावर पिकअपचा टायर फुटून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन महिला आणि एक पुरुषाच्या समावेश आहे.
या बाबतचे वृत्त असे कि, धामणगाव परिसरातील वंजारवाडी येथील महिला मजूर यांना कांदा काढणीसाठी हिवरा गावाकडे जात होत्या. या पिकअप जीप मध्ये 22 जण होते. हे सर्व कांदा काढणीसाठी हिवरा गावाकडे जात असतांना कड्याच्या जवळ पिकअपचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 15 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
काय आहे भारत पाकिस्तान सिंधू नदी पाणी वाटप करार? जाणून घ्या
सध्या उन्हाळी कांदा कापण्यासाठी कापण्याचे काम चालू आहे त्यातच आपल्या गावामध्ये मजूर मिळत नाही. त्यामुळे दुसऱ्या गावावरून मजूर आणावा लागतो म्हणून एकाच गावातील तब्बल २२ लोक घेऊन जाणारे पिक अप चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि थेट एका खड्ड्यात जाऊन पडले.
यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये श्रावणी विक्रम महाजन वय १४, ऋतुजा सतीश महाजन वय १६ आणि अजित विठ्ठल महाजन वय १४ या तिघांचा मृत्यू झाला आहे तर त्यामध्ये जवळपास १५ महिला जखमी आहेत वाहन चालक देखील गंभीर जखमी झाला आहे.
इतर ०८ जखमींवर जामखेड येथील काळे रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर इतर दोन जखमींवर कडा येथे उपचार सुरू आहेत. उर्वरित पाच जणांना अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये या पिक अप चा चक्काचूर झाला.