मोतीलाल कोठारी विद्यालयाची यशस्वी निकालाची परंपरा, निकाल 99.60%

कडा

in article

kada mkv result महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या  मोतीलाल कोठारी विद्यालयाने 99.60% निकाल घेत परंपरा कायम ठेवली. विद्यालयात मुलींनी मारली बाजी
कु गाडे प्राजक्ता सुनिल हिने 98.40% गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
कु सोनवणे श्रावणी महादेव, नाथ कांदबरी सचिन, गिऱ्हे संस्कृती बाळासाहेब या तीन विद्यार्थ्यांनीनी सारखे 97.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला.
तसेच एकशिंगे गौरव बिबिषण व कुमखाले सार्थक शरद या दोन विद्यार्थ्यांनी  96.20% समान गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला.

विद्यालयातून 250 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी 249 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.193 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. तर 63 विद्यार्थ्यांनी 90 %पेक्षा अधिक मार्क मिळवले आहेत.

सर्व उत्तीर्ण झालेल्या यशस्वी ,गुणवंत विद्यार्थ्यांचे श्री.अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकारी व मुख्याध्यापक  शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here