ताज्या बातम्या

धुळीचे साम्राज्य, रस्त्याची अडचण; व्यावसायिकांनी अडवला महामार्ग

By admin

February 06, 2024

 

कडा,

Kada ashti road andolan कडा- साबलखेड-चिंचपुर रस्ता काम संथगतीने चालले असल्याने मोठ्या प्रमाणावर धुळीचा सामना करावा लागत असल्याने याचा बाजारपेठेवर परिणाम झाला आहे.त्याच बरोबर हाॅटेल व्यावसायिक देखील अडचणीत आल्याने या कामाला गती मिळावी यासाठी कडा येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात मंगळवारी सकाळी ११ वाजता रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

आणखी वाचा : छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यातल्या सर्वांत उंच पुतळ्याचं रत्नागिरीत लोकार्पण

बीड नगर राष्ट्रीय क्रमांक ५६१ हा महामार्गावरील आष्टी ते साबलखेड १७ किलोमीटर अंतरावरील १२१ कोटी रूपयाचा रखडलेल्या या रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यांपासून सुरू करण्यात आले आहे.हे काम अंत्यत संथगतीने चालू असल्याने याचा परिणाम शहरातील बाजारपेठेवर होत आहे.त्याच बरोबर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हाॅटेल व्यावसायिकांना देखील मोठा फटका बसला असून दररोज मोठ्या प्रमाणावर धुळीचा सामना करावा लागत आहे.सदरील अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने या संथकामाला व दररोज उडणाऱ्या धुळीला शहरातील व्यापारी,नागरिक व हाॅटेल व्यावसायिक वैतागून गेल्याने मंगळवारी अखेर बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी तालुक्यातील कडा येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

 

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी माजी सरपंच संपत सांगळे,अनिल ढोबळे,हेमंत मेहेर,योगेश भंडारी,नागेश कर्डिले,बिपीन भंडारी, सुनिल रेडेकर, बाबूशेठ भंडारी, संजय मेहेर,धनजंय मुथ्था,दिपक गरूड, सोमनाथ गायकवाड, प्रकाश खेडकर, प्रवीण बहिर,संतोष ओव्हाळ,राजू रासकर,कालू शेख, बबन औटे, संकेत चौधरी,गणेश घोलप, विष्णू कुसळकर,सुनिल आष्टेकर, दिपक सोनवणे,संग्राम ढोबळे, निखिल ढोबळे, इब्राहिम सय्यद,रविंद्र ढोबळे,डाॅ.महादेव चौधरी,भाऊसाहेब भोजने,निलेश अनारसे, पिंटू कर्डीले,संदिप भळगट,जयंत खंदारे, दत्ता होळकर,आदि व्यापारी,हाॅटेल व्यावसायिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग अभियंता आर.व्ही.भोपळे,आष्टी तहसीलचे कडा येथील तलाठी जगन्नाथ राऊत यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर रस्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.