hiware bazar school राज्यभर सरकारी कर्मचार्यांचा संप चालू आहे. त्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचाही सहभाग आहे. सध्याचा कालखंड विद्यार्थ्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे.
ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आदर्श गाव हिवरे बाजार येथे अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या गावचे निवृत्त कर्मचारी आणी ग्रामस्थच अध्यापनाचे काम करत आहेत.
हिवरेबाजार गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि संस्थेची माध्यमिक शाळा आहे. या दोन्ही शाळेतील शिक्षक जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून संपावर गेले आहेत.
त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील लोकांनी या शाळेत शिकविण्याचे ठरविले. त्याप्रमाणे hiware bazar village मधील सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी, सोसायटी चेअरमन व सदस्य, शिक्षक पालक संघाचे सदस्य व गावातील सुशिक्षित पालक तसेच कोविड काळातील फ्रंटलाईन टिम संप सुरू झाल्यापासून अध्यापनाचे काम करत आहेत.
ग्रामीण भागात शाळेतील सर्व विद्यार्थी शेतकरी, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात. त्यांना इतर कुठलीही खासगी क्लासची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक भवितव्य हे शिक्षकांवर आणि शाळेवरच अवलंबून असते.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामस्थामार्फत प्राथमिक शाळा सकाळी ७.३० ते ११ व माध्यमिक शाळा सकाळी ७.३० ते १२ या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
explain the success story of hiware bazar कोविड काळातही संपूर्ण देशभर शाळा बंद असताना हिवरे बाजारमध्ये १५ जून ते १५ एप्रिल या शैक्षणिक वर्षात कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून ऑफलाईन शाळा सुरू ठेवली होती.
त्याचाच परिणाम प्राथमिक शाळेतील २४ विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत व यशवंत माध्यमिक विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील १४ विद्यार्थी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
सध्या संपात सहभागी असलेले शासकीय कर्मचार्यांच्या न्याय मागण्यांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकर निर्णय घ्यावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली.