helina missile test

ताज्या बातम्या

helina missile test रणगाडाविरोधी गाईडेड क्षेपणास्त्र ‘हेलिना’ची यशस्वी उड्डाण चाचणी

By admin

April 11, 2022

 

 

helina missile test हेलिना या रणगाडा विरोधी गाईडेड क्षेपणास्त्राची 11 एप्रिल 2022 रोजी उंच पर्वतरांगांमध्ये स्वदेशी बनावटीच्या हेलीकॉप्टरवरून यशस्वी उड्डाण चाचणी घेण्यात आली. युजर प्रमाणीकरण चाचण्यांचा भाग म्हणून  संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या शास्त्रज्ञांचे गट आणि भारतीय लष्कर व भारतीय हवाईदल यांनी संयुक्तपणे ही चाचणी घेतली. आधुनिक कमी वजनाचे हेलीकॉप्टर (ALH) वापरुन ही चाचणी करण्यात आली आणि कृत्रिम रणगाडा लक्ष्य निर्धारित करून हे क्षेपणास्त्र सोडण्यात आले. क्षेपणास्त्र सोडण्याआधी इन्फ्रारेड इमेजिंग सिकर या तंत्राच्या वापराने क्षेपणास्त्राला दिशा निर्देश देण्यात येतात. हे जगातील सर्वात आघाडीच्या आधुनिक रणगाडाविरोधी शस्त्रापैकी एक आहे.

पोखरण येथे झालेल्या प्रमाणीकरण चाचण्याचा पुढील भाग म्हणून उंच पर्वतरांगांमध्ये घेतली गेलेली क्षमता चाचणी ही या क्षेपणास्त्राची आणि कमी वजनाचे हेलीकॉप्टर यांच्या संयुक्त एकात्मिक क्षमतेची चाचणी होती. लष्कराचे वरिष्ठ कमांडर्स व संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक या चाचणीला उपस्थित होते.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संयुक्त कामातून पहिले लक्ष्य साध्य केल्याबाबत  संरक्षण आणि संशोधन विकास संस्था आणि भारतीय लष्कर या दोहोंचे अभिनंदन केले आहे. कठीण परिस्थितीत प्रशंसनीय कार्य पार पाडल्याबद्द्ल  संरक्षण व संशोधन विकास विभागाचे सचिव व संरक्षण व संशोधन विकास संस्थेचे  अध्यक्ष जी सतिश रेड्डी यांनी या कामात सहभागी असलेल्या चमूंचे अभिनंदन केले.