सत्तेच्या दबावाखाली चुकीचे दाखले दिले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करा
*मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक ; पंकजाताई मुंडे यांची मागणी*
*राज्याच्या प्रमुखांनी ओबीसी आंदोलनाला भेट देऊन बहुजनांना सन्मान द्यावा*
मुंबई
Have wrong certificates been issued under duress? सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज ट्विटद्वारे सरकारकडे केली.
सहयाद्री अतिथीगृहात आज राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक सरकारने बोलावली होती. वडीगोद्री येथे सुरू असलेल्या आंदोलना संदर्भात ही बैठक होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पंकजाताई मुंडे यांच्यासह प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.
लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या उपोषणा संदर्भात पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत सरकारकडे मागणी केली आहे ,त्या म्हणाल्या, राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय देण्यासंदर्भातील भूमिका आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत. शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल असं त्या म्हणाल्या.
[…] दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेल… […]