फ्रान्समध्ये सेंट-ट्रोपेझ येथे 43व्या जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य क्रीडा स्पर्धांमध्ये सशस्त्र दल वैद्यकीय सेवेतल्या चार अधिकाऱ्यांनी घडवला इतिहास

Four Armed Forces Medical Service (AFMS) Officers have brought laurels to India


Four Armed Forces Medical Service (AFMS) Officers have brought laurels to India फ्रान्समध्ये सेंट-ट्रोपेझ येथे 16 ते 23 जून 2024 या कालावधीत झालेल्या 43 व्या जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य क्रीडा स्पर्धांमध्ये सशस्त्र दल वैद्यकीय सेवेतल्या  (AFMS) चार अधिकाऱ्यांनी विक्रमी 32 पदके जिंकून भारतासाठी गौरवास्पद कामगिरी बजावली आहे. आरोग्य व्यावसायिकांसाठी भरवल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेत लेफ्टनंट कर्नल संजीव मलिक, मेजर अनिश जॉर्ज, कॅप्टन स्टीफन सेबॅस्टियन आणि कॅप्टन डॅनिया जेम्स या अधिकाऱ्यांनी 19 सुवर्ण पदके, 09 रौप्य पदके आणि 04 कांस्य पदके जिंकून इतिहास रचला.

विजयी कामगिरी पुढीलप्रमाणे आहे:

in article

लेफ्टनंट कर्नल संजीव मलिक व्हीएसएम, पाच सुवर्ण पदके

मेजर अनिश जॉर्ज, चार सुवर्ण, सहा रौप्य आणि दोन कांस्य पदके

कॅप्टन स्टीफन सेबॅस्टियन, सहा सुवर्णपदके

कॅप्टन डॅनिया जेम्स, चार सुवर्ण, तीन रौप्य, दोन कांस्य पदके

सशस्त्र दल वैद्यकीय सेवेचे महासंचालक  लेफ्टनंट जनरल दलजीत सिंग यांनी या अधिकाऱ्यांचे नेत्रदीपक कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे आणि भविष्यात त्यांच्याकडून आणखी गौरवास्पद कामगिरी घडावी यासाठी   शुभेच्छा दिल्या आहेत.

आरोग्य व्यावसायिकांसाठी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा म्हणून कायम ओळखले जाणाऱ्या  जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य क्रीडा स्पर्धा या  वैद्यकीय समुदायातील सर्वात प्रतिष्ठित जागतिक क्रीडा स्पर्धा म्हणून विकसित झाल्या आहेत. सन 1978 पासूनचा वारसा असलेल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये दरवर्षी 50 पेक्षा जास्त निरनिराळ्या राष्ट्रांमधून 2500 हून अधिक खेळाडू सहभागी होतात.

भारतीय सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवा अधिकाऱ्यांची कामगिरी केवळ त्यांची श्रेष्ठता अधोरेखित करित नाही तर जागतिक स्तरावर आरोग्यसेवा व्यावसायिकांचे त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कौशल्यासोबतच क्रीडा क्षेत्रातील कामगिरीद्वारे त्यांचे समर्पण देखील दर्शविते. यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील हजारो डॉक्टर आणि परिचारिकांना तंदुरुस्तीचे राजदूत बनण्यासाठीही प्रेरणा मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here