fire broke in gangamai sugar factory ahmednagar

ताज्या बातम्या

स्फोट झाला… ते पळाले! आणि पुढे काय घडले? 

By admin

February 25, 2023

 

 

fire broke in gangamai sugar factory ahmednagar स्फोट झाला… ते पळाले! आणि पुढे काय घडले?

शेवगाव,

सायंकाळी ६.४५ ची वेळ अचानक कारखान्यातील आतील भागात मोठ्ठा आवाज झाला आणि आम्ही दोघे जण बाहेर पळालो.बाकीचे बाहेरच्या बाजूला होते, मोठ्ठा आवाज झाल्याने काहीच ऐकू येत नव्हते…गंगामाई शुगर कारख्ण्याच्या इथेनाल प्रकल्पाला लागलेल्या आगीत जखमी झालेला अशोक गायकवाड सांगत होता..

शेवगाव पासून पैठण रस्त्यावर बाभूळगाव शिवारात असलेल्या गंगामाई साखर कारखान्याच्या उपपदार्थ निर्मिती डिस्टिलरी प्रकल्पाला शनिवारी सायंकाळच्या सुमारास मोठी आग लागली.

आगीच्या ज्वाळांचे उग्ररुप इतके भयानक होते की, आगीचे लोळ आसपासच्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील गावामध्ये दिसून येत होते.या घटनेत दोन जण किरकोळ जखमी  झाले.त्यापैकी एक असलेलेले अशोक गायकवाड.

जसा स्फोट झाला तसे कामगार बाहेर पळाले आणि यामध्ये एकही जीवित हानी झाली नाही हे सुदैव..

Read more: दोन मुलीवर बलात्कार करण्याऱ्या बापाला जन्मठेप  

गंगामाई साखर कारखान्याच्या पासून काही अंतरावर हे इथेनाल ethanol प्रकल्प आहे. या प्रकल्पात एकूण ३२ कामगार कार्यरत होते. त्यापैकी दोघे हे आतमध्ये मेन ऑपरेटर रूम मध्ये होते, जसा आवाज आला तसे ते बाहेर पळाले.

दरम्यान आगीची माहिती मिळताच आसपासच्या तालुक्यातील साखर कारखाने, विविध संस्थांचे अग्निशमन दलाचे पथक बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्री उशीरपर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले.

यासंदर्भात कारखान्याचे संचालक रणजीत  मुळे  यांनी सांगितले कि, ही आग शॉट सर्किट मुळे लागली असून यामध्ये कोणतीही जीवित हानी नाही. मात्र या आगीमुळे कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या टाक्यांमध्ये प्रेशर निर्माण झाले आणि मोठा आवाज झाला.

पोलीस निरीक्षक विलास पुजारी हे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. आगीचे वाढते प्रमाण, दरम्यान टाक्यांचे होणारे स्फोट लक्षात घेऊन, पोलिसांनी कारखाना स्थळाच्या परिसरातील आसपासच्या तीन ते चार किलोमीटर अंतरातील गावातील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना केल्या आहेत.