festivals in maharashtra : सह्याद्रीच्या रांगेतील कठ्याची यात्रा

- Advertisement -
- Advertisement -

अकोले

festivals in maharashtra अकोले तालुक्यातील कौठेवाडी गावातील बिरोबा यात्रा कठ्याची यात्रा  Kauthewadi Kathyachi Yatra  म्हणून प्रसिद्ध आहे. डोक्यावर लाल निखाऱ्याची तेवत असलेली मातीची घागर घेऊन भाविकांनी बिरोबाच्या मंदिराला फेरा मारण्याची प्रथा शेकडो वर्षापासून सुरु आहे.

महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं आणि तेथील भागातील देवस्थानांची प्रथा परंपरा ही अनोखीच असते. अशीच एक प्रथा अक्षय तृतीयनंतरच्या येणाऱया पहिल्या रविवारी अकोले तालुक्यातील कौठेवाडी गावच्या यात्रेत बघावयास मिळते. कोरोनामुळे यात्रेत दोन वर्षे खंड पडला होता. मात्र, यंदा यात्रा भरल्याने मोठी गर्दी झाली होती. त्याचसोबत कठ्यांची संख्याही 91 होती.

 

Biroba Yatra
Biroba Yatra छायाचित्रे : विलास तुपे, राजूर 

 

मध्यरात्रीपर्यंत भक्तगण फेऱ्या मारतात – कठा म्हणजे बुडाच्या बाजूने कापलेली मातीची घागर माठ असतो. कापलेला भाग या घागरीत आतल्या बाजूला उघडा करून ठेवला जातो. त्यात खैराची पेटणाऱ्या झाडांची लाकड उभी केली जातात. त्यात कापूस टाकत ती बाहेरच्या बाजूने नवीन कोऱ्या कपड्याने त्याला घट्ट बांधाले जाते. त्याला फुलांचा हार तसेच इतर आकर्षक सजावट करुन मंदिरासमोर हे कठे ठेवले जातात. दर्शनसाठी आलेले अनेक भाविक या कठ्यांवर थोड थोड तेल टाकत राहतात. त्यानंतर साकीरवाडी गावाला मान असलेली कठी मंदिरात रात्री नऊला पोहचल्यानंतर हे कठे पेटवले जातात. हे पेटलेले आणि आग ओकणारे धगधगणारे कठे डोक्यावर घेऊन ‘हुई हुई’चा आवाज करत भक्तगण मध्यरात्रीपर्यंत बिरोबाच्या मंदिराला फेऱ्या मारतात.

festivals in maharashtra कठ्याची आख्यायिका

भक्तांच्या अंगात बिरोबाचा संचार – कठ्यातील निखाऱ्याने अथवा तप्त तेलाने एखाद्या भाविकालाही इजा होत नाही. यात काही अंधश्रद्धा नसून, केलेला नवस पूर्ण झाल्यावर नवस पुर्तीसाठी कठा तयार केला जातो. तसेच, आगीची घागर डोक्यावर घेणाऱ्या भक्तांच्या अंगात बिरोबाचा संचार झालेला असतो, अशी धारणा भाविकांची आहे.

ही प्रथापंरा कधी सुरू झाली – जुन्या जाणतांच्या मते हे बिरोबा देवस्थान मोगलांच्या काळातील आहे. शिवनेरी किल्ल्यावर हल्ला झाला तेव्हा लोक सैरावैरा पळू लागले. त्यावेळी काही लोक कौठेवाडी येथे आले. येताना आपला दगडरुपी देव घेऊन आले. नंतर सर्व शांत झाल्यावर ते पुन्हा जावू लागले तेव्हा लहानसा दगड काही केल्याने हलेना. तेव्हा हा प्रांत जाहगिरी खाली होता. तेथील जहागिरदाराने भोईर आणि भांगरे यांनी कसण्यास जमीन देत येथेच स्थायिक होण्यास सांगितले. तेव्हापासून येथे बिरोबाची पूजा करण्यात येते.

Kauthewadi Kathyachi Yatra
Kauthewadi Kathyachi Yatra फोटो विलास तुपे राजूर 

बिरोबाच्या यात्रेची माहिती देताना ग्रामस्थांनी माहिती दिली कि,नवसपुर्तीसाठी कठा अर्पण करतात – कठा परंपरा अतिशय पुरातन काळापासून सुरू असून याचे अनेक दाखले आणि अख्यायिका आहेत. पुरातन काळात काही धनगर समाजाची लोक डोंगरात मेंढर चारण्यासाठी घेवून आली होत. तेव्हा त्यांच्यावर आलेलं संकट बिरोबाच्या नवसान दूर झाले आणि ते भयमुक्त झाले. तेव्हापासून महाराष्ट्रात ही कठ्याची परंपरा सुरू आहे. आज मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यातून भाविक या यात्रेसाठी येतात. बिरोबाला नवस करतात आणि पूर्ण झाल्यावर नवसपुर्तीसाठी कठा अर्पण करतात.

ipl 2022 closing ceremony इथे होणार ipl चा फायनल सामना

‘हाईऽऽऽ हाईऽऽऽ’ असं लयबद्ध चित्कार – डोक्यावर पेटलेले कठे. त्यातून उसळणाऱ्या तप्त ज्वाला. शरीरावर ओघळणारे उकळत तेल. मंदिरात अविरतपणे सुरू असलेला घंटानाद. दैवताच्या नावाचा जयघोष. संबळ, धोदाणा-पिपाणी, डफ, ताशा, अशा पारंपरिक वाद्यांचा सुरू असलेला गजर आणि अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने ‘हाईऽऽऽ हाईऽऽऽ’, असं लयबद्ध चित्कार करत लोक बिरोबाचा गजर करतात. अक्षय तृतीयनंतरच्या पहिल्या रविवारी हा थरार पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने कौठेवाडी गावात रात्री जमा होतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles