बीड
farmers opposes shaktipeeth highway in beed राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाला बीड जिल्ह्यात विरोध होताना दिसून येत आहे. बीडच्या अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असून या ठिकाणचे शेतकरी या महामार्गाविरोधात आक्रमक झालेले दिसून आले आहेत.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! जनावरांसाठी मिळणार पशुधन अधिकारी !
जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई तालुक्यातील ज्या गावातुन शक्तिपीठ महामार्ग पप्रस्तावित आहे त्या अनेक गावांमध्ये सीमांकनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. वरवटी, सायगाव, पिंपळा धायगुडा, भारज, गित्ता या गावात शेतकऱ्यांनी एकत्र येत मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध केलाय. कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी या महामार्गाला न देण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेत यावेळी घोषणाबाजी केलीये. यावेळी एड.एल.एन. शिंदे, व्यंकट ढाकणे, खुर्शीद अली, संदीपान कांबळे आदी सह महिला शेतकऱ्यांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे. शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आपली मोजणी सोडून माघारी जावे लागले आहे.
नागपूर ते गोवा जाणाऱ्या या महामार्गाला आता राज्यभरातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून विरोध होताना दिसत आहे. या विकासकामाच्या विरोधात शेतकरी सुद्धा आक्रमक झाला आहे. दरम्यान कोल्हापूरमध्ये सुद्धा अत्यंत आक्रमक पद्धतीने शक्तीपीठला विरोध होत आहे. अशातच आता या विरोधाची धग बीड जिल्ह्यापर्यंत पोहचली आहे.
farmers opposes shaktipeeth highway in beedशक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची विभागीय परिषद संपन्न
शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची मंगळवार दि 8 रोजी लातूर या ठिकाणी विभागीय परिषद संपन्न झाली या परिषदेला परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार त्र्यंबकनाना भिसे, अखिल भारतीय किसान सभा राज्य अध्यक्ष कॉ.उमेश देशमुख कॉ. एड.अजय बुरांडे, गोकुळ दूध संघाचे संचालक प्रकाश पाटील, कॉ.शिवाजीराव मगदूम, कॉ.सम्राट मोरे, महेश खराडे, जलतज्ञ प्रा.देसरडा सर, एड. उदय गवारे, गोविंदराव घाटोळ, सचिन दाने, गजेंद्र येळकर, सतिश कुलकर्णी, संभाजी फरताडे, विजय पाटील, उमेश एडके यांच्यासह मराठवाड्यातील व इतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य किसान सभा, प्रतिनिधी इतर शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी त्यासोबतच पर्यावरण प्रेमी, पशु पक्षी प्रेमी, अर्थतज्ञ, 12 जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी, महिला, नागरिक उपस्थित होते.
सुरुवाती पासून विरोधच
शक्तिपीठ महामार्ग संदर्भात किसान सभा सुरुवातीपासून विरोध करत असून राज्यासह जिल्ह्यातील शेकडो एक्कर सुपीक, बागायती जमीन संपादित करून शेतकऱ्यांना कायम स्वरूपी भूमिहीन करत भिकेला लावणारा हा शक्तीपिठ महामार्ग असून नानाप्रकारे राज्यात शेतकऱ्यांना शेती व्यवसायापासून दूर करण्याचे आणि भांडवली हितसबंध जोपासायचे हे षडयंत्र हे सत्ताधारी करीत आहेत.जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई येथील अनेक गावांत या महामार्गाच्या सीमांकनास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत आलेल्या अधिकाऱ्यांना मागारी पाठवले. शक्तीपिठ महामार्ग विरोधात किसान सभा शेतकऱ्यांच्या सोबत लढत याला विरोध करणार आहे.