कडा दि 15 डिसेंबर ,प्रतिनिधी
शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क गांज्याची झाडे लावल्याचा प्रकार अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारखेल बुद्रुक येथे घडला. पोलिसांनी या शेतात धाड टाकून शेतकऱ्यांसह गांज्याची झाडे जप्त केली. अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डी बी कुकलारे यांनी या गांज्याची शेतीची माहिती मिळताच सहकाऱ्यांसह आरोपी सचिन साहेबराव जाधव, रा.कारखेल बुद्रुक, ता.आष्टी याच्या शेतात धाड टाकली. आरोपीने त्याचे घराचे बाजुला विना परवाना बेकायदेशिररित्या गांजाची झाडे लावून त्याचे संवर्धन व जोपासना करताना मिळून आला.
हेही वाचा:स्काऊट गाईडचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्यपालांचे पदग्रहण
शासकीय पंचाच्या समक्ष इलेक्ट्रॉनिक वजन काटा, पोलीस स्टॉफसह कारखेल शिवारात शेत सर्वे नं.86 मध्ये जावून छापा टाकला.त्याचे मोजमाप करण्यात आले.यामध्ये आल्याने सदर ठिकाणाहुन एकूण 16 किलो 830 ग्रॅम वजनाची 1,68,300/- रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक डी बी कुकलारे यांचे फिर्यादीवरून आरोपी सचिन साहेबराव जाधव, रा.कारखेल बुद्रुक, ता.आष्टी याचेविरुध्द अंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंभोरा पोलीस हे करीत आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक डी.बी.कुकलारे, पोउपनि/आर.पी.लोखंडे, पोना/1724 पी.व्ही. देवडे, पोना/223 के.बी.राठोड, पोशि/ए.सी.बोडखे, चालक पोशि/1282 शौकत शेख यांनी केली.