राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून खुलासा

Disclosure by State Common Entrance Examination Hall
Disclosure by State Common Entrance Examination Hall

Disclosure by State Common Entrance Examination Hall राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून घेण्यात आलेल्या MHT-CET 2024 संदर्भात काही आक्षेप पालक,परिक्षार्थी आणि लोकप्रतिनिधी यांनी घेतले आहेत याबाबत वस्तुस्थितीदर्शक  खुलासा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून करण्यात आला

 राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्याकडून अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र,कृषीशिक्षण याअभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली MHT-CET 2024 ही सामाईक  प्रवेश परीक्षा दिनांक 22 एप्रिल, 2024 ते 30 एप्रिल, 2024 (पीसीबी ग्रुप) आणि दिनांक 02 मे, 2024 ते 16 मे, 2024 (पीसीएम ग्रुप) या कालावधीत एकूण 169 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.पीसीबी ग्रुपची परीक्षा 12 सत्रांमध्ये व पीसीएम ग्रुपची परीक्षा 18 सत्रांमध्ये घेण्यात आलेली आहे. सदर परीक्षेस एकूण 3 लाख 30 हजार 988 विद्यार्थी, 3 लाख 94हजार 33 विद्यार्थीनी  व 31 ट्रान्सजेंडर उमेदवार होते.सदर परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली.या पैकी 6लाख75 हजार 377 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

in article

उमेदवाराचे एखाद्या प्रश्नांचे उत्तर चुकीचे असल्यास त्या प्रश्नाला ऋण गुण (Negative Marks) देण्याची पध्दत नाही. सदर निकाल पर्सेंटाईल पध्दतीने घोषित करण्यात आलेला आहे.सदर परीक्षेच्या निकालामध्ये कोणत्याही उमेदवाराला अनुग्रह गुण (Grace Marks) देण्यात आलेले नाहीत. 

या परीक्षेअंतर्गत प्रश्न अथवा उत्तर याबाबतीत पालक/परिक्षार्थी यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील तर सीईटी कक्षामार्फत  ऑनलाईन पध्दतीने आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपांची विषय निहाय तज्ज्ञांकडून पडताळणी करुन घेण्यात आलेली आहे व त्या अनुषंगााने उत्तर तालिकेमध्ये (Answer Sheet) योग्य ते बदल करून याबाबतचा अहवाल उमेदवारांच्या माहितीकरीता सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. सदर सुधारित उत्तरतालिकेचा अंतर्भाव करुन निकाल प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवाराला मिळालेल्या गुण निकाल प्रक्रियेच्या सुत्रानुसार सत्रनिहाय  निकाल पर्सेंटाईल स्वरुपात घोषित करण्यात आलेला आहे.

त्यानंतर मा.आमदार आदित्य ठाकरे यांनी याबाबत काही आक्षेप पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडले आहेत. यामध्ये समान  गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे पर्सेटाईल दाखविलेले आहेत.  हा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही. एकाच सत्रात समान गुण (Raw Score) मिळालेल्या उमेदवारांना समान पर्सेंटाईल मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे सदर परीक्षा वेगवेगळ्या दिवशी प्रत्येकी दोन सत्रात घेण्यात आलेली आहे. त्यामुळे विविध सत्रांमधील समान गुण (Raw Score) मिळालेल्या उमेदवारांना वेगवेगळे पर्सेंटाईल मिळालेले आहेत.

तसेच उमेदवारांना उपलब्ध केलेल्या उत्तर तालिके प्रमाणे त्यांनी काढलेले गुण त्यांना मिळालेले नाहीत.हे सुद्धा आक्षेप वस्तुस्थितीला धरून नाही   या कार्यालयामार्फत उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. उमेदवारांनी नोंदविलेल्या आक्षेपांची विषय निहाय तज्ज्ञांकडून पडताळणी करुन घेण्यात आलेली आहे व त्या अनुषंगााने उत्तर तालिकेमध्ये (Answer Sheet) योग्य ते बदल करून याबाबतचा अहवाल उमेदवारांच्या माहितीकरीता सीईटी कक्षाच्या cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. सदर सुधारित उत्तरतालिकेचा अंतर्भाव करुन निकाल प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवाराला मिळालेल्या गुण निकाल प्रक्रियेच्या सुत्रानुसार सत्रनिहाय  निकाल पर्सेंटाईल स्वरुपात घोषित करण्यात आलेला आहे. 

 सदर परीक्षा वेगवेगळ्या बॅचद्वारे घेवून त्याची एकच गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते.  परंतू प्रत्येक बॅचला वेगवेगळी प्रश्नपत्रिका असते.असा आक्षेप आहे. तथापि प्रत्येक सत्राचा निकाल स्वतंत्रपणे तयार करण्यात  येतो. सदरची कार्यपध्दती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर आहे एप्रिल2024परीक्षेआधी प्रसिध्द करण्यात आली होती.  त्यामुळे हा आक्षेप  वस्तुस्थितीला धरून नाही तसेच आतापर्यंत सीईटी सेल, मुंबई कार्यालयामध्ये निवेदन घेवून आलेल्या जवळपास 200पालकांचे/उमेदवार तसेच ईमेलद्वारे प्राप्त झालेल्या निवदेनांचे शहानिशा करून प्रत्येक तक्रारींचे निराकरण करण्यात येत आहे.  

यामध्ये सर्व सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी बॅचप्रमाणे पर्सेंटाईल पध्दतीने निकाल जाहीर करण्यात येतो ही परीक्षा पध्दत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून राबविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here