dhanajay munde corona quarantine

ताज्या बातम्या

क्वारंटाईन असतानाही धनंजय मुंडे ऍक्शन मोडवर

By admin

December 26, 2023

क्वारंटाईन असतानाही धनंजय मुंडे ऍक्शन मोडवर

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या 113व्या बैठकीस लावली ऑनलाइन उपस्थिती

पुणे

dhanajay munde corona quarantine कोविडची बाधा झाल्याने पुणे येथील निवासस्थानी क्वारंटाईन राहून उपचार घेत असलेले कृषिमंत्री धनंजय मुंडे आज ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांनी घरूनच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या 113व्या बैठकीस ऑनलाइन पध्दतीने उपस्थिती लावली.

नगर आष्टी अमळनेर रेल्वे लवकरच सुरु?

या बैठकीत कृषी परिषदेच्या 112व्या बैठकीचा कार्यपूर्ती अहवाल व इतिवृत्त मंजुरीसाठी सादर करण्यात आले. कृषिमंत्री धनंजय मुंडे हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. या बैठकीच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

धनंजय मुंडे हे मागील 5 ते 7 दिवसांपासून कोविड बाधित असून ते पुणे येथील निवासस्थानी उपचार घेत आहेत. आजपासून त्यांनी ऑनलाइन पद्धतीने कामकाजास सुरुवात केली आहे.