भानुदास एकनाथच्या जयघोषात एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Departure of Eknath Maharaj's palanquin to Pandharpur amid the cheers of Bhanudas Eknath

छत्रपती संभाजीनगर

in article

Departure of Eknath Maharaj’s palanquin to Pandharpur amid the cheers of Bhanudas Eknath संत एकनाथ महाराजांच्या पालखीने भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे आज पैठण येथून प्रस्थान केलंय. एकनाथ महाराजांच्या पालखीस मानाचा तिसरा क्रमांक आहे. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद व सोलापूर अशा ५ जिल्ह्यातून पालखी मार्गक्रमण करणार आहे. पंढरपूरपर्यंत १९ दिवसांचा प्रवास करत आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरला पालखी पोहोचणार आहे. मराठवाड्यातील वारकऱ्यांच्या जवळपास ९० दिंड्या नाथांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. तत्पूर्वी गोदावरी तीरावर प्रस्थान सोहळा रंगला होता. यंदा एकनाथ महाराजांच्या पालखीचे सोहळ्याचे ४२५ वे वर्ष आहे.

गेल्या ४२४ वर्षांपासून हजारो वारकरी नाथांच्या पैठण नगरीत जमा होतात. टाळ मृदंगाच्या गजरात आनंदाने ‘भानुदास एकनाथ’ असा जयघोष करीत पालखी प्रस्थान करते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here