नाशिक
Deolali Camp Artillery Field Firing Range Cannon Ball Explosion Killed Two agniveers देवळाली कॅम्प आर्टिलरी फिल्ड फायरिंग रेंज याठिकाणी
अग्नीविरांची टीम तोफ चालविण्याचे प्रशिक्षण घेत असताना इंडियन फिल्ड
गनद्वारे (तोफ) बॉम्बगोळा डागत असताना झालेल्या स्फोटात दोन अग्निवीरांचा
मृत्यू झाला. अन्य एक अग्निवीर जखमी असून लष्कराच्या रुग्णालयात
त्याच्यावर उपचार सुरू आहे. गोहिल विश्वराज सिंग (वय २०), सैफत शीत
(वय२१दोघे रा. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड) अशी मृत्युमुखी पडलेल्या
अग्निवीरांची नावे आहेत.
नाशिक शहरात देवळाली कॅम्प येथे स्कुल ऑफ आर्टिलरी चे शिंगवेबहुला
फायरिंग रेंज असून काल दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
अग्निविरांची एक तुकडी शिंगवे बहुलाला फायरिंग रेंज या ठिकाणी तोफेचा
सराव करण्यासाठी गेलेली होती. यावेळी अग्निवीरांच्या चमूने बॉम्बगोळा
फायर केला असता त्याचा तोफेजवळ स्फोट झाला. यामुळे बॉम्बचे तुकडे उडून या
अग्निवीरांच्या शरीरात शिरले. तिघा जखमींना तात्काळ देवळाली कॅम्प
हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी
गोहिल आणि सैफत यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत पोलिसांनी अकस्मात
मृत्यूची नोंद केली आहे.