Dearness Allowance (DA) increased for central government employees पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए) आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई मदत (डीआर) चा अतिरिक्त हप्ता १ जानेवारी २०२५ पासून देण्यास मंजुरी देण्यात आली. ही वाढ मूळ वेतन/निवृत्तीवेतनाच्या ५३% दरापेक्षा २% वाढ दर्शवते.
महागाई भत्ता आणि महागाई मदत या दोन्हींमध्ये वाढ झाल्यामुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी ६६१४.०४ कोटी रुपये इतका परिणाम होईल. याचा फायदा सुमारे ४८.६६ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६६.५५ लाख निवृत्तीवेतनधारकांना होईल.
ही वाढ ७ व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित स्वीकृत सूत्रानुसार आहे.