आष्टी
Cm Devendra Fadanvis visit ashti beed दि.5 फेब्रुवारी 2025 रोजी खुंटेफळ साठवण तलाव थेट पाईपलाईन कामाची पाहणी आणि श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव येथील समाधी मंदिराचे गाभारा बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनियुक्त सभापती ना.प्रा.राम शिंदे आणि जागतिक खो-खो स्पर्धेमध्ये जगज्जेतेपद मिळवलेल्या भारतीय संघातील सहभागी असलेल्या महाराष्ट्र राज्यातील महिला व पुरुष संघातील खेळाडूंचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की
आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या खुंटेफळ साठवण तलावाच्या थेट पाईपलाईन कामाची पाहणी आणि श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव येथील समाधी गाभारा भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते होणार असून याच कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती पदी निवड झालेले प्राध्यापक राम शिंदे यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे .
विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह असून या सभागृहाचे सभापती पदी आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधीची निवड झाली आहे याचा आनंद म्हणून या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
खुंटेफळ साठवण तलाव येथे शिंपोरा तालुका कर्जत येथून उजनी धरणाचे पाणी थेट पाईपलाईन द्वारे येणार असून या पाईपलाईन कामाची पाहणी आणि संपूर्ण भारत देशातून दरवर्षी भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात .
असे प्रसिद्ध क्षेत्र असलेले श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ समाधीस्थळ असलेले मायंबा येथील समाधी मंदिराचे गाभाऱ्याचे नव्याने बांधकाम होणार असून या बांधकामाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते होत असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे नवनियुक्त सभापती प्राध्यापक राम शिंदे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून यानिमित्ताने प्राध्यापक नामदार राम शिंदे यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे .
खुंटेफळ साठवण तलाव हा आपला ड्रीम प्रोजेक्ट असून आष्टी आणि पाटोदा तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मराठवाड्याच्या हक्काचे 5.68 टीएमसी पाण्यापैकी सध्या 1.68 टीएमसी मंजूर असून या प्रकल्पाद्वारे 28 हजार हेक्टर सिंचन होणार असल्यामुळे संपूर्ण आष्टी तालुक्याचे लक्ष या प्रकल्पाकडे लागून आहे.
दि. 5 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या या कार्यक्रम स्थळाची पाहणी आमदार सुरेश धस यांनी केली असून त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कामाला लागल्याचे दिसून येत आहे सुमारे एक लक्ष जनसमुदाय या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावा यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.