बर्निंग कारचा थरार ! दोघांचा जळून मृत्यू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

जामखेड प्रतिनिधी

Burning car two died with burning जामखेड शहरातील बीड रोडवरील एक किमी अंतरावरील एका हॉटेल च्या समोर एक चारचाकी वाहन रस्त्याच्या दुभाजकाला धडकले. यामुळे गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतला.

या अपघातात जामखेड शहरातील एका पान शॉप सेंटर च्या मालकासह जामखेडच्या एका पोलीस कर्मचार्‍याचा गाडीत जळुन दुर्दैवी मुत्यू झाला. ही दूर्दैवी घटना आज दि २४ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान घडली.

या व अपघात मृत्यू झालेल्या जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश गुडवाल, वय ३५ वर्षे, ब.न. २४९९ व पान शॉप मालक, महादेव दत्ताराम काळे, वय अंदाजे २८ वर्षे, रा. आदित्य मंगल कार्यालय शेजारी, बीड रोड, जामखेड आशा दोघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की मयत मयत महादेव काळे व पोलीस कर्मचारी धनंजय गुडवाल हे दोघे जण आज सोमवार दि २४ फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहनातुन बीड रोडकडुन जामखेड शहराच्या दिशेने येत होते. यावेळी त्यांच्या चारचाकी वाहनाने शहरापासून एक किलोमीटर अंतरावरील एका हॉटेल समोरील दुभाजकाला जोराची धडक दिली.

त्यामुळे गाडी मधिल दोघांना गाडीच्या बाहेर पडता आले नाही आणि त्यामुळे दोघांचा गाडीत जळुन दुर्दैवी मुत्यू झाला. घटनास्थळी आपघात झाल्या नंतर पोलीस कर्मचारी गुडवाल यांचा मोबाईल फोन हा रस्त्याच्या बाजूला पडलेला मिळुन आला.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे त्या ठिकाणी आले यानंतर जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

यानंतर तातडीने जामखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या वाहनास बोलवण्यात आले. जामखेड नगरपरिषदच्या आय्यास शेख, विजय पवार, अहमद शेख या अग्रिशमन दलाच्या जवानांनी तब्बल एक तास पाणी मारुन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गाड़ीने पुर्ण पेट घेतला होता व गाडी जळुन खाक झाली होती. त्यामुळे गाडीतील दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता..

घटनास्थळी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी स्पॉट पंचनामा केला व दोघांच्या मृतदेहाचे घटनास्थळीच वैद्यकीय अधिकारी डॉ शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन केले.

आपघातील मयत महेश काळे याचे बीड रोडवर साईनाथ पान शॉप नावाचे पानशॉप आहे तर धनंजय गुडवाल हे जामखेड पोलीस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करीत होते.

सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.

दोन वर्षापासून जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग अपुर्ण काम

दोन वर्षापासून अपुर्ण काम, दिशादर्शक फलक, रेडियम कुठेही नाहीत, मधेच काही ठिकाणी डिव्हाइडर तसेच डिव्हाइडर साठी सोडलेल्या जागेवर खड्डे यामुळे अनेक अपघात होतात यामुळे च वेगाने असलेली गाडी डिव्हाइडर वर आदळून पेट घेतल्याने गाडीसह दोघे जळून खाक झाले आहेत. लवकरात लवकर रस्ता प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली आहे.

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील बीड रोडवरील एक कीमी अंतरावरील एका हॉटेल च्या समोर एक चारचाकी वाहन रस्त्याच्या दुभाजकाला धडकले. यामुळे गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतला. या अपघातात जामखेड शहरातील एका पान शॉप सेंटर च्या मालकासह जामखेडच्या एका पोलीस कर्मचार्‍याचा गाडीत जळुन दुर्दैवी मुत्यू झाला. ही दूर्दैवी घटना आज दि २४ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान घडली.

या आपघात मृत्यू झालेल्या जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय नरेश गुडवाल, वय ३५ वर्षे, ब.न. २४९९ व पान शॉप मालक, महादेव दत्ताराम काळे, वय अंदाजे २८ वर्षे, रा. आदित्य मंगल कार्यालय शेजारी, बीड रोड, जामखेड आशा दोघांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की मयत मयत महादेव काळे व पोलीस कर्मचारी धनंजय गुडवाल हे दोघे जण आज सोमवार दि २४ फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहनातुन बीड रोडकडुन जामखेड शहराच्या दिशेने येत होते. यावेळी त्यांच्या चारचाकी वाहनाने शहरापासून एक कीमी अंतरावरील एका हॉटेल समोरील दुभाजकाला जोराची धडक दिली. परीणामी सदरचे वहान अत्याधुनिक पध्दतीचे असल्याने गाडी लॉक झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गाडी मधिल दोघांना गाडीच्या बाहेर पडता आले नाही आणि त्यामुळे दोघांचा गाडीत जळुन दुर्दैवी मुत्यू झाला. घटनास्थळी आपघात झाल्या नंतर पोलीस कर्मचारी गुडवाल यांचा मोबाईल फोन हा रस्त्याच्या बाजूला पडलेला मिळुन आला.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे त्या ठिकाणी आले यानंतर जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तातडीने जामखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या वाहनास बोलवण्यात आले. जामखेड नगरपरिषदच्या आय्यास शेख, विजय पवार, अहमद शेख या अग्रिशमन दलाच्या जवानांनी तब्बल एक तास पाणी मारुन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गाड़ीने पुर्ण पेट घेतला होता व गाडी जळुन खाक झाली होती. त्यामुळे गाडीतील दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता.

घटनास्थळी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी स्पॉट पंचनामा केला व दोघांच्या मृतदेहाचे घटनास्थळीच वैद्यकीय अधिकारी डॉ शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन केले. आपघातील मयत महेश काळे याचे बीड रोडवर साईनाथ पान शॉप नावाचे पानशॉप आहे तर धनंजय गुडवाल हे जामखेड पोलीस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करीत होते. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.

दोन वर्षापासून जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग अपुर्ण काम

दोन वर्षापासून अपुर्ण काम, दिशादर्शक फलक, रेडियम कुठेही नाहीत, मधेच काही ठिकाणी डिव्हाइडर तसेच डिव्हाइडर साठी सोडलेल्या जागेवर खड्डे यामुळे अनेक अपघात होतात यामुळे च वेगाने असलेली गाडी डिव्हाइडर वर आदळून पेट घेतल्याने गाडीसह दोघे जळून खाक झाले आहेत. लवकरात लवकर रस्ता प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles