बीड,
beed umed pradarshan ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्यावतीने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान दिनांक 20 मार्च 2025 ते 24 मार्च 2025 या कालावधीत वेळ सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत उत्सव स्वयंसहायता समूहातील महिलांच्या प्रगतीचा, उत्सव महा खरेदीचा उत्सव, महा मेजवानीचा, गुढीपाडवा महोत्सव ईद बाजार व खाद्य जत्रा आणि जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन 2025 जिल्हा परिषद बीड येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
खास आकर्षण मसाले, खाद्यपदार्थ, हस्तकला, ग्रामीण कलाकुसर, ज्वेलरी तसेच शाकाहारी व मांसाहारी मेजवानी व खुप काही आयोजित करण्यात आलेले असून प्रवेश विनामुल्य आहे. तरी सर्व जनतेने याचा लाभ घेऊन एकवेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन डी आर डी ए च्या प्रकल्प संचालक संगीतादेवी पाटील यांनी केले आहे