आष्टी
Beed Suresh Dhas on minister Dhananjay Munde राज्याचे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील आणखी तीन मंत्र्याचे घोटाळे भाजपचे आमदार सुरेश धस उघडकीस करणार आहेत.
जेव्हापासून सुरेश धस यांनी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांना लक्ष केल्यामुळे सुरेश धस चर्चेत आले आहेत. त्यांनी यापूर्वी तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील पिक विमा घोटाळा बाहेर काढला.
तसेच राज्यात विविध ठिकाणी झालेल्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे संदर्भातील माहिती जनतेसमोर आणली.
दरम्यान सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने त्यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. या सर्व आरोपांना त्यांनी उत्तरही दिले आहे.
मात्र उद्या होणाऱ्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये ते राज्यातील मागच्या सरकारच्या काळामध्ये असलेल्या मंत्र्यांचे घोटाळे ही बाहेर काढणार आहेत. या मंत्र्यांच्या लिस्टमध्ये कोणकोणत्या मंत्र्यांची नावे असणार आहेत हे उद्या पत्रकार परिषदेत कळणार आहे. त्याबद्दल बाबत त्यांनी सस्पेन्स ठेवला असून नागरिकांची उत्कंठा वाढली आहे.
आता धस यांच्या निशाण्यावर अब्दुल सत्तार ?
माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात काही अनधिकृत कामे केली आहेत का ? या संदर्भात धस उद्या सविस्तर बोलणार आहेत. ते काय आरोप करतात हे उद्या कळेल.
मात्र त्यांनी या सोबत आणखीही काही मंत्र्यांचे कारनामे उघड करणार असल्याचे बोलले आहे. या मध्ये कोणाचा नंबर लागणार हे पाहणे गरजेचे आहे.