Beed Suresh Dhas बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्दयीपणे हत्या करणार्या आणि त्यांना मदत करणाऱ्या आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचण्याचे काम करण्याची शंभर टक्के जबाबदारी मी स्वीकारलेली असून देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोग ग्रामस्थांसह न्यायाचा लढा लढण्याचा आपला संकल्प आहे.
मुंडे भेटीबद्दल मला षडयंत्र करून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे .परंतु हा प्रयत्न यशस्वी होणार नसून येत्या 20 तारखेला कृषी विभागातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा पत्रकार परिषद घेऊन आपण उघडकीस आणणार आहोत.
अशी स्पष्टोक्ती आमदार सुरेश धस यांनी केली आहे मुंबई येथे माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांचेकडे अनेक विषयांवरील पत्राद्वारे मागणी करण्यात आली असून त्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास यंत्रणेमध्ये सायबर विभागाचे तज्ञ असलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात यावा कारण संतोष देशमुख यांची निर्दयीपणे हत्या केल्यानंतर काही आरोपी निष्पन्न झाले आहेत .
परंतु त्यांचे मोबाईल त्यांनी फेकून दिल्यामुळे सायबर क्षेत्रातील तज्ञांद्वारे त्यामधील माहिती गोळा करण्यासाठी दोन अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच परळी येथील महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी 15 महिने उलटून देखील अद्यापही पोलीस यंत्रणेला सापडत नाहीत हे दुर्दैवी असून ही घटना घडली, परळी शहर पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला तेव्हापासूनचे तपास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक, अंबाजोगाई उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाजोगाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक, आणि तत्कालीन बीडचे पोलीस अधीक्षक असे सर्व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांनी या पंधरा महिन्यांमध्ये या खून प्रकरणांमध्ये दिरंगाई का केली ? याचा खुलासा त्यांना विचारण्यात यावा अशी मागणी आपण लेखी पत्राद्वारे केली आहे.
तसेच करुणा धनंजय मुंडे या परळी येथे आल्या असताना त्यांचे त्यांचे विरुद्ध षडयंत्र रचून पिस्तूल बाळगल्याचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि खाजगी राजकीय व्यक्तींची चौकशी करून एका असहाय्य महिलेला अन्यायकारक पद्धतीने कारागृहात पाठवण्यात आले या प्रकरणाची देखील सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आपण केली आहे.
तसेच खाकी वर्दीतील गुन्हेगारासारखे वर्तन करणाऱ्या गणेश अर्जुन मुंडे नावाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक धाराशिव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतो त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल होतो तरीही तो पोलीस दलात कार्यरत राहून धाराशिव जिल्ह्यातील महामार्ग सुरक्षा विभागात बदली करून घेतो लगेचच पाच महिन्यातच पुन्हा बीड जिल्ह्यात बदली होऊन येतो आणि पुन्हा पुणे जिल्ह्यात बदली होऊन जातो या अंदाधुंद कारभाराची चौकशी करावी आणि वादग्रस्त गणेश अर्जुन मुंडे याची आज वरच्या संपूर्ण सेवा कालावधीची चौकशी करण्यात यावी आणि त्याच्यावर उचित कार्यवाही करावी अशी मागणी देखील आपण केली आहे ,असे सांगत त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या राज्याच्या पोलिस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या विश्वासू उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आपण केली आहे.
असे सांगत आजारी असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीबद्दल मी केवळ माणुसकी म्हणून भेटलो या भेटीला महिना उलटून गेल्यानंतर दुसऱ्या एका घटनेचा संदर्भ देऊन दोन्ही घटनांची सांगड घालून माझ्या बदनामीचे षड्यंत्र रचून एका माध्यम प्रतिनिधीला हाताशी धरून माझी बदनामी केली आहे मुंबई येथील शासकीय निवासस्थानी रात्री साडेनऊ वाजता चोरून लपून न जाता उघडपणे घेतलेल्या या भेटीबाबत षडयंत्र रचल्याचे उघड झाले आहे.
या याविषयी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलल्यानंतरच या ठराविक कंपनी बाबत योग्य वेळ आल्यानंतर त्यांची नावे जाहीर करीन असे सांगत धनंजय मुंडे आणि आपल्या भेटीत कोणत्याही प्रकारचे प्रकरण मिटवण्याची चर्चा झाली नाही असा खुलासा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहेच.
तरीही 20 फेब्रुवारी रोजी मागील कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना फसवून करोडो रुपयांचा महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आणणार असून त्यासाठी विशेष पत्रकार परिषद घेणार आहे असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे नियोजन व अर्थ विभाग असल्यामुळे बीड जिल्हा नियोजन व विकास निधीतील 73 कोटी रुपयांची बोगस बिले काढणाऱ्यांची चौकशी करण्यात यावी आणि परळी नगर नगरपरिषद येथे काही ठराविक व्यक्तींच्या नावे कोट्यावधी रुपयांचा निधी बोगस पद्धतीने कामे न करता उचलण्यात आलेला आहे तसेच बीड जिल्ह्यातील विकास निधी एकीकडे आणि परळीतील विकास निधी एकीकडे अशा प्रकारचा निधी वाटपाचा असमतोल झाल्यामुळे परळी नगर परिषदेचे ऑडिट करण्यात यावे.
अशी मागणी आपण उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली असून लवकरच याबाबत कारवाई होणार आहे असेही त्यांनी शेवटी सांगितले. राज्यातील आमदारांचे पोलीस संरक्षण कमी करण्यात आले आहे याबाबत एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की मी संरक्षण मागितले नाही आणि मला देण्यात आलेले नाही पण तरीही मला कर नाही त्याला डर नाही या न्यायाने मला कोणाची भीती वाटत नाही आणि वाटणारही नाही असेही त्यांनी शेवटी सांगितले.