आष्टी (प्रतिनिधी)
Beed sarpanch santosh deshmukh murder case गेल्या काही वर्षात बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवण्यात आली असून गोरगरिबांच्या लेकराचा दिवसा ढवळ्या निर्घृणपणे खून करण्यात आला असून..त्यामुळे मानवतेचे धिंडवडे निघाले आहेत.. बीड जिल्ह्यात काय करून ठेवले आहे ?
असा सवाल करत भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी याबाबत अत्यंत कठोर कारवाई करून या खून प्रकरणातील सर्व आरोपी, त्यांचे पाठीराखे, त्यांचे मार्गदर्शक (आका ) शोधून त्यांचेवर कठोर कारवाई करण्यासाठी अगोदर सीआयडी ऐवजी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपासी यंत्रणा स्थापन करावी अशी मागणी केली परंतु याप्रकरणी उच्च पदस्थ काही व्यक्तींचा हात असल्याचे निष्पन्न झाल्यास जिल्हा पोलीस प्रमुख यांचे वर दबाव येऊ शकतो त्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास यंत्रणा स्थापन करावी अशी मागणी केली..
मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाची सविस्तर कहाणी कथन करताना स्वतःसह संपूर्ण सभागृह भावना विवश झाले असल्याचे दिसून आले
केज तालुक्यातील मस्साजोग येथील अत्यंत गरीब घरातील लोकनियुक्त तरुण सरपंचाची क्षुल्लक कारणावरून निर्दयपणे हत्या केली आहे
यापुढे अशा प्रकारच्या गोरगरीब लेकरांचे खून होऊ नयेत म्हणून या प्रकरणातील प्रत्यक्ष गुन्हेगार आणि त्यांच्या सूत्रधारावर कायम जरब बसेल अशी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे असे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील घटनाक्रम सांगताना अत्यंत आक्रमक आणि धाडसी वृत्ती बद्दल प्रसिद्ध असणारे आमदार सुरेश धस हे देखील हेलावून घेण्याचे पाहायला मिळाले त्याचबरोबर संपूर्ण सभागृहातील सदस्य देखील हा वृत्तांत ऐकून गलबलून गेल्याचे दिसून येत होते
पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, मस्साजोग येथील तरुण सरपंच हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख म्हणून काम करत होता केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्यासाठी त्याने काम केले आहे अत्यंत गरीब घरातील हा तरुण तिसऱ्यांदा सरपंच झाला आहे तीन वेळा आमदार होणे सोपे आहे परंतु तीन वेळा सरपंच होणे सोपे नाही अवादा या
पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना गेल्या दोन महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यातील एका तालुक्यामध्ये बोलवून घेऊन त्यांना दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती त्यातील काही रक्कम देण्यात आली होती आणि उर्वरित रकमेसाठी त्यांच्याकडे सतत मागणी होत होती या अवादा कंपनीच्या कार्यालयाकडे मस्साजोग येथील काही तरुण सुरक्षारक्षकाचे काम करतात शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर रोजी केज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विष्णू चाटे यांनी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, आणि इतर काही जणांना कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पाठवले त्यावेळी गेटवर असलेल्या सुरक्षारक्षकाने अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन जावे असे सांगताच त्याला मारहाण करण्यात आली हा तरुण दलित घटकातील असताना त्याला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली आणि मारहाण करण्यात आली हे समजताच सरपंच संतोष देशमुख हे त्या ठिकाणी गेले आणि प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न करत असता त्यांनाही मारहाण झाली त्यानंतर पोलिसांचे काही कर्मचारी आले आणि या तरुणांना घेऊन गेले दलित तरुणाला मारहाण झाल्याबद्दल जातिवाचक शिवीगाळ केल्याबद्दल ॲट्रॉसिटी कायद्यानुसार फिर्याद
देण्यासाठी हा सुरक्षा रक्षक गेला होता त्याचबरोबर अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील कार्यालयासमोर सुरक्षारक्षकाला मारहाण झाली याबाबत कंपनीतर्फे देखील फिर्याद देण्यात आली परंतु त्या दिवशीचे ठाणे अंमलदार चार तास पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित नव्हते या दोन्ही फिर्यादी पोलिसांनी नोंदवून घेतल्या नाहीत कारण त्यावेळी पोलीस स्टेशन येथे विष्णू चाटे स्वतः येऊन पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत होता त्यावेळी या पोलीस अधिकाऱ्यांना कोणाकोणाचे फोन आले ? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत दलित तरुणाला आणि संतोष देशमुख यांना मारहाण करणाऱ्या सुदर्शन घुले, प्रतीक घुले, केदार आणि इतर दोन-तीन आरोपींवर थातुरमातुर अदखलपात्र गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ सोडण्यात आले
त्यानंतर शनिवार आणि रविवारी केजचे पोलीस उपनिरीक्षक भोसले हे सुदर्शन घुले यांना मोटार सायकल घेऊन फिरत होते त्यावेळी एका हॉटेलमध्ये संतोषच्या भावाची भेट झाली त्यांनी प्रकरण मिटवण्यासाठी संतोषला ठाण्यात पाठवून द्या असे सांगितले संतोष देशमुख त्यांच्या आते भावासह दिनांक 9 डिसेंबर रोजी केज पोलीस स्टेशन येथे गेले परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रकरण मिटवायचे नाही असे समजल्यानंतर ते परत आले त्यानंतर भर राज्य रस्त्यावर टोल नाक्यावर त्यांचे अपहरण त्यांना अज्ञात ठिकाणी नेण्यात आले त्यांचे आते भावाने परत पोलीस स्टेशनमध्ये येऊन या घटनेची माहिती दिली आणि विष्णू चाटे यांना फोन करून माझ्या भावाला मारू नका अशी विनंती केली विष्णू चाटे यांना 35 वेळा फोन केला त्यावेळी ते 20 मिनिटात संतोष याला आणून सोडतो असे म्हणायचे परंतु चार तासाने त्याचा मृतदेह आढळून आला त्याचे डोळे लाईटरने जाळण्यात आले होते त्याच्या शरीरावर एक मिलिमीटर देखील जागा शिल्लक नव्हती इतक्या अमानुषपणे त्याला शरीरावर मारहाण करण्यात आली होती त्याने पाणी मागणी केली असता त्याला आणि पाणी देखील देण्यात आले नाही त्याचे अंगावर दीडशे ते दोनशे घाव घालण्यात आले असून या अमानुष मारहाणीत त्याचे अडीच तीन लिटर रक्त गोठल्याचे दिसून येत होते अशी माहिती बीड जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिल्याची माहिती सांगत आमदार पुढे म्हणाले की, संतोष देशमुख याला मारहाण करत असतानाचा व्हिडिओ काढण्यात आला असून त्या द्वारे कोणाला ही मारहाण झाल्याचे दाखवत होते त्याचे हे नाव शोधण्यात यावे तसेच संतोष देशमुख याचे अपहरण करून कळंब येथील एका महिलेकडे त्याला घेऊन जाऊन त्याचे विरुद्ध खोटी तक्रार दाखल करण्याचा या गुन्हेगारांचा उद्देश होता अशी माहिती आपल्याला मिळाली आहे असे सांगत आमदार धस पुढे म्हणाले की किरकोळ मारहाण झाल्यानंतर वास्तविक पाहता या आरोपींवर अदखलपात्र गुन्हा दाखल असला तरी प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी तालुका दंडाधिकारी अथवा स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे कडे पाठवले असते तर या आरोपींना थोडाफार धाक राहिला असता आणि ते घाबरले असते तर हा पुढील अनर्थ टळला असता परंतु पोलिस कोणाच्या दबावाखाली होते ?
याची सखोल चौकशी करण्यात यावी असे मागणी करून आमदार सुरेश धस पुढे म्हणाले की,
बीड जिल्हा हा परभणी जिल्ह्याच्या शेजारी असून या ठिकाणी वाहणाऱ्या मोठ्या नद्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाळू उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा लिलाव न होता कोणतीही रॉयल्टी ची पावती न फाडता दिवसा ढवळ्या शासकीय मालमत्तेवर दरोडा घालून प्रत्येकी 10 टन वाळू वाहतूक करण्याच्या क्षमतेचे 300, 300 हायवा दिवसा ढवळ्या रस्त्यावरून धावत असतात या वाहनांद्वारे कोट्यावधी रुपयांची दिवसभरात कमाई केल्याशिवाय ही गुन्हेगार मंडळी झोपत नाहीत या सर्व गुन्हेगारांचा सूत्रधार कोण आहे ? कोणाच्या आशीर्वादाने दिवसाढवळ्या शासकीय मालमत्तेवर दरोडा घातला जातोय ? याची चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर मुंबई पेक्षाही बीड जिल्ह्यामध्ये शस्त्रास्त्र परवाने ज्यादा असून बाराशे ते तेराशे शस्त्रास्त्र परवानाधारक आहेत ते कसे परवाना मिळवतात ? याची मला माहिती आहे ते मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे परंतु हे दिखाऊ कार्यकर्ते शस्त्र परवानाधारक हे गोरगरिबांना धाक दाखवण्यासाठी या पिस्तुलांचा वापर करतात ..धाब्यावर बसून ते फायरिंग करतात लग्नकार्यात देखील ते शस्त्र अडकवून आपण फार मोठे आहोत असे दाखवण्याचा असतात यांना कशासाठी शस्त्र पुरविण्यात आले आहे ? याची चौकशी होईपर्यंत या सर्व पिस्तूल रिवाल्वर परवानाधारकांची शस्त्रे बीड जिल्हाधिकाऱ्यांनी जमा करून घ्यावीत
संतोष देशमुख याचे मारेकरी असलेले विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि केदार या आरोपींचे गेल्या वर्षभरातील कॉल डिटेल्सची चौकशी करण्यात यावी गेल्या वर्षभरात ते कोणाला भेटले ? कोणा बरोबर फोटो काढले ? कुठे कुठे ते त्यांच्याबरोबर गेले होते ?
या सर्व सूत्रधारांचा शोध घेण्यात यावा
या क्रूरकर्म्यांचे “आका ” कोण आहेत ?
याचा शोध घेऊन महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या गंभीर प्रकरणाची दखल घेतील याचा मला पूर्ण विश्वास असून
ही बीड जिल्ह्यातील दादागिरी आणि दहशतवाद मोडून काढण्याची क्षमता असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संपूर्ण महाराष्ट्र राज्याला अपेक्षा आहेत त्यामुळे या सर्व गुन्हेगारांसह त्यांच्या सूत्रधार यांचेवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा, राष्ट्रीय सुरक्षा कायदा, तसेच झोपडपट्टी दादा कायदा, एम पी डी ए या कायद्यान्वये सर्वांना स्थानबद्ध करण्यात यावे त्यातून संपूर्ण महाराष्ट्र राज्याला संदेश मिळेल की, गोरगरीब तरुणांची हत्या केल्याचा परिणाम काय होतो ?
याचे उदाहरण महाराष्ट्र राज्यामध्ये दिसून येईल त्यामुळे या प्रकरणी अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी शेवटी केली
सत्ताधारी पक्षाचे आमदार असून देखील आमदार सुरेश धस यांनी सर्वसामान्य तरुण असलेला सरपंच याची निर्घृण हत्ये प्रकरणी अत्यंत आक्रमकपणे, कठोरपणे,अभ्यासपूर्ण आणि धाडसीपणे हा विषय सभागृहात मांडला याबद्दल बहुसंख्य आमदारांनी त्यांना पाठिंबा दर्शवला नागपूर अधिवेशनामध्ये अनेक आमदारांनी त्यांचे कौतुक केले आहे
गुन्हेगार आणि त्यांना बळ देणाऱ्यांवर मोक्का कायद्यानुसार कठोर कारवाई करा-आ.सुरेश धस
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -