मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातील तीन आरोपींच्या मृत्यू बाबत मोठा खुलासा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड

Beed sarpanch murder case बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपींची हत्या झाली असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितले होते. या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिली होती. मात्र या प्रकरणातील आता खुलासा पोलिसांनी केला आहे.

म्हसाजोग ता.केज,जि.बीड येथील सरपंच कै.संतोष देशमुख यांचे हत्या  प्रकरणात अंजली दमानिया , सामाजिक कार्यकर्त्या यांना त्यांचे भ्रमणध्वरीवर व्हाईस मेसेस मध्ये बश्वेश्वर कल्याणला तीन डेथ बॉडया सापडल्या आहेत ती खात्रीलयक माहिती नाही आपण ओपन नाही करायच अशा मजकूराची व्हाईज मेसेज अंजली दमानिया यांना आला होता.

यासंदर्भात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास केल्यानंतर असा काहीएक प्रकार घडलेला नसुन, ज्या इसमाने श्रीमती अंजली दमानिया यांना व्हाईस मेसेज पाठविला त्याने मद्यार्काचे नेशेमध्ये असे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.

तरी नागरिकांना सुचित करण्यात येते की, कृपया अशी कोणतीही माहिती असल्यास आपण प्रथम पोलीसांशी संपर्क करावा आरोपीचे शोध कार्यास अडथळा अथवा जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारची माहिती कॉमेंट किंवा व्यतव्य करु  नये. काही उपयुक्त माहिती असल्यास बीड पोलीसांना कळवुन  तपास कार्यास सहकार्य करावे. असे बीड पोलीस दल नागरिकांना आवाहन करीत आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles