Kej
beed Santosh deshmukh murder case mcoca walmik karad बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात खंडणी प्रकरणात अटकेत असलेले वाल्मीक कराड यांना आता संतोष देशमुख हत्याच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे. या प्रकरणी उद्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.
mcoca act on वाल्मिक कराड याच्यावर फक्त खंडणी प्रकरणाचा गुन्हा दाखल होता. विशेष तपास पथकाने आज न्यायालयात वाल्मीक कराड याला संतोष देशमुख यांच्या हस्ते प्रकरणातील गुन्ह्यात वर्ग करण्यासंदर्भातील अर्ज दाखल केला. त्यानंतर न्यायालयाने तो मंजूर केल्याने त्याच्यावर थेट मकोका लावण्यात आला.
आणखी वाचा सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींवर मोक्का
या पूर्वी अवादा एनर्जी या कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड ला केज न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सीआयडी ने वाढीव दहा दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र आरोपीच्या वकिलाने तपास पूर्ण झाल्याने वाढीव कोठडीची गरज नाही अशी माहिती दिली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला.मात्र वाल्मीक कराड यांच्यावर मकोका लावल्याने त्यांना आता पुन्हा उद्या कोर्टात हजर केले जाणार असून मकोका संदर्भात सुनावणी होईल.
यापूर्वी या हत्याच्या गुन्ह्यात असलेल्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
यामधे सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे.