beed rain

ताज्या बातम्या

beed rain आष्टी तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केली पाहणी

By admin

October 16, 2022

 

आष्टी

beed rain गेल्या काही दिवसापासून आष्टी तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांचे नुकसान झाले. तर रस्त्याची दुरवस्था झाली. या नुकसानीची पाहणी बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केली. शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची माहिती घेत पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर चिखल तुडवत जाऊन शेतकऱ्यांशी भेटून चर्चा केली.  नुकसान झालेल्या भागातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.कुजलेले‌ सोयाबीन पिक हातात घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत तुम्ही एकटे नाहीत शासन प्रशासन तुमच्या पाठीशी म्हणत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.rain forecast in ashti यावेळी आ.बाळासाहेब आजबे,उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसिलदार विनोद गुंडमवार, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,तलाठी, ग्रामसेवक,कृषी सहायक, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

beed rain

सासूचे २५ तोळ्याचे दागिने चोरताना जावई cctv त कैद

ashti आष्टी तालुक्यात परतीच्या पावसाने पुरपरिस्थिती निर्माण झाली होती.धोधो पावसाने अनेक नद्या नाल्यांना पुर,पुल तुटले, वाहतूक ठप्प होती.काही गावांचा संपर्क तुटला शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले,जमिनी खरडून गेल्या उद्भवलेल्या स्थितीची जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी रविवार दि.१६ आॅक्टोंबर रोजी दुपारी १२ च्या दरम्यान चिखलातून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले व‌ कांदा, कापूस, सोयाबीन,तुर,या पिकांची पाहणी केली.

 

जिल्हाधिकारी म्हणाले शेतमालाचे नुकसान झाले आहे. पडलेली घरे, शेतीचे नुकसान, विविध विभागांचे नुकसान, मृत किंवा जखमी व्यक्ती, पायाभुत सुविधांमध्ये रस्ते, पूल, वीज पुरवठा नुकसानीची भरपाई करण्यासाठी तसेच पूरग्रस्त नागरिकांना मदत देण्यासंदर्भात तात्काळ पंचनामे करून अहवाल पाठवावे‌ अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या यावेळी तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी, सरपंच सतिश धस, सरपंच बबन शेकडे, दादासाहेब शिंदे,रामा झगडे, हनुमान झगडे,सरपंच राहुल जगताप, सरपंच अशोक पोकळे,संदिप पानसाडे, संतोष सानप,मारुती पवार,संदिप सानप,भिमराव सानप,राजेंद्र हराळ,विनोद झाबळे,सुरेश पवार,प्रकाश सोले आदी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

beed rain पूरग्रस्तांशी संवाद

आष्टी तालुक्यातील सोलेवाडी येथील नदीच्या पुराच्या पाण्यात पुल वाहून गेला होता.व शेतकऱ्यांच्या पोल्ट्रीमध्ये पाणी शिरल्याने कोंबड्या मृत व वाहून गेल्या परतीच्या पावसाने शेतातील पिके उद्धवस्त झाली सोलेवाडी येथील शेतीची कोंबड्या वाहून गेलेल्या पोल्ट्री ची,व वाहून गेलेल्या पुलाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांच्या भेटी घेत जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या व्यथा जाणून, नुकसान ग्रस्तांना धीर देत अधिका-यांना नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश यावेळी दिले.

पंचनामे न करता सरसकट हेक्टरी ५० हजार नुकसान भरपाई द्यावी जिल्हाधिकारी यांच्याकडे आ.बाळासाहेब आजबे यांची निवेदनाद्वारे मागणी

rain in beed today आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यात परतीच्या पावसाने मागील पंधरा दिवसापासून हाहाकार माजवला असून अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे रब्बीची पेरणी देखील शेतकऱ्यांना करता आली नाही शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे तरी बागायती क्षेत्रासाठी सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये तर जिरायती क्षेत्रासाठी पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे आ.आजबे यांनी केली आहे.