बीड
Beed nongrant teachers on ajit pawar शाहू फुले आंबेडकर विनाअनुदानित आश्रम शाळा येथील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केली होती पण त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसापासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावरती असून त्यांना घेराव घालण्यात येणार असल्याचे शिक्षकांनी सांगण्यात आला आहे त्यांनी आमची भेट घेऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या शिक्षकांकडून करण्यात येत आले.
मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा न थांबता पुढील नियोजित कार्यक्रम स्थळाकडे रवाना झाला. यानंतर शिक्षक आंदोलन आक्रमक झाले यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. दरम्यान आंदोलन करतोय शिक्षक केशव आंधळे यांना भुरळ आल्याने त्यांना तात्काळ एक रिक्षा थांबून जिल्हा रुग्णालय येथ उपचारासाठी पाठवण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तगडा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात कुठेही अडथळा निर्माण झाला नाही.
अजित पवारांच्या ताफ्यासमोर शिक्षक आक्रमक
मागील १० दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाला बाहेर शिक्षकांचे बेमुदत उपोषण सुरू आहे
आत्महत्याग्रस्त धनंजय नागरगोजे यांना न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली
शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रम शाळेचे कर्मचारी शिक्षक आक्रमक
अर्धा तास रास्ता रोको आंदोलन…. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती खेडेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजित उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक आहे. या बैठकीत शिक्षकांच्या शिष्टमंडळाची भेट घालून देऊ असे आश्वासन दिल्यानंतर अर्धा तासानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित केले.