बीड
beed nishedh morcha मसाजोग येथील सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्म्यांना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मोर्चा निघणार आहे.
स्व.संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आज सर्वपक्षीय, सर्व समाज आणि संघटनांची एकत्र बैठक बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे संपन्न झाली.
बैठकीच्या सुरुवातीला सामूहिक पणे स्व.संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
स्व.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येवून प्रयत्न करायला हवे असे मत या बैठकीत मांडले.
यावेळी उपस्थित सर्वांनी एकमताने दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी बीड मध्ये भव्य मोर्चा काढण्याचे निश्चित केले आहे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या भव्य मोर्चाला सुरुवात होणार आहे.
अन्यायाच्या विरोधातील मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.