.
मुंबई
beed ncp jilhadhyaksha राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदावर शेतकरी मित्र राजेंद्र मस्के यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी जिल्हाध्यक्ष पद आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कडे होते.
बीड विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर खासदार बजरंग बाप्पा सोनवणे व आमदार संदीप क्षीरसागर यांनी पक्ष श्रेष्ठीकडे मागणी करून जिल्हाध्यक्ष पदाची धुरा राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपवली.
राज्य विधानसभा निवडणुकी नंतर प्रथमच गेली दोन दिवसापासून मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका चालू होत्या .आज पक्षाचे सर्वेसर्वा खा. मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मित्र राजेंद्र मस्के यांची बीड जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती जाहीर करून नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, बीडचे आ. संदीप भैय्या क्षीरसागर,खा.निलेश लंके, प्रदेश युवा अध्यक्ष महेबूब शेख,माजी आ. पृथ्वीराज साठे,राजेसाहेब देशमुख, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
लोकसभा निवडणुकीनंतर राजेंद्र मस्के यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन शरदचंद्र पवार साहेबांचे नेतृत्व स्वीकारले. अत्यंत चुरशीच्या बीड विधानसभा निवडणुकीत आ. संदीप क्षीरसागर यांच्या विजयासाठी अथक परिश्रम घेतले. बीड जिल्ह्यात शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने बीडचा गड राखला.
या विजयात राजेंद्र मस्के व त्यांच्या मित्रमंडळाचे योगदान आहे.आगामी काळात मजबूत संघटन आणि पक्ष विस्तारासाठी राजकीय व सामाजिक कामाचा अनुभव लक्षात घेऊन राजेंद्र मस्के यांची बीड जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.या नियुक्ती मुळे जिल्हाभरात पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक यांच्या कडून राजेंद्र मस्के यांचे अभिनंदन केले जात आहे.