बीड
Beed murder case CID recover mobile मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ती साठी वापरण्यात आलेल्या स्कार्पिओ गाडी मधून सीआयडी अधिकाऱ्यांना तपासाच्या संदर्भातील मोठे घबाड सापडले आहे. हे घबाड म्हणजे दोन मोबाईल सापडले असून यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या करतानाचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे. यातून अनेक गोष्टी बाहेर पडणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या राज्यात गाजत असून या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. राज्य गुन्हे शाखेचे सीआयडी चे पथक बीडमध्ये तळ ठोकून असून या संदर्भातील आरोपींच्या जवळच्या लोकांची चौकशी केली जात आहे.
https://x.com/anjali_damania/status/1873297518110662774?t=kxoscgGCbK1SvWcArig7RA&s=19
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स यास समाज माध्यमावर आपला व्हिडिओ पोस्ट केला असून या संदर्भात पोलिसांना जप्त केलेल्या स्कार्पिओ गाडी मधून दोन मोबाईल मिळाले आहेत. या मोबाईल मधून पोलिसांनी डाटा रिकव्हर केला असून यामध्ये त्यांना सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओही चित्रित करण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तसेच या मोबाईलवर मोठ्या नेत्याचा फोन आला असल्याचे त्यांनी सांगितले असून या मोठ्या नेत्याचे नाव पोलिसांनी घोषित करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.