मतमोजणी निरीक्षकाने केली स्ट्रॉंग रूमची पाहणी

- Advertisement -
- Advertisement -

मतमोजणी निरीक्षकाने केली स्ट्रॉंग रूमची पाहणी

बीड,

beed loksabha election strong room नाथापूर रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन येथे असणाऱ्या स्ट्रॉंग रूमची मतमोजणी निरीक्षक बसवराज आर सोमन्ना यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यासह पाहणी केली.The counting inspector inspected the strong room

मंगळवार दिनांक 4 जून रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून 39 बीड लोकसभा मतदार संघाचे स्ट्रॉंग रूम शासकीय तंत्रनिकेतन येथे असून या ठिकाणी करण्यात आलेली व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी मतमोजणी निरीक्षक बसवराज आर सोमन्ना यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह केली.

या ठिकाणी तयार करण्यात आलेले केज, बीड, माजलगाव, परळी, गेवराई, आष्टी सहा विधानसभा मतदार क्षेत्रातील स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी कक्षात मतमोजणीसाठी लावण्यात आलेली व्यवस्थेची पाहणी केली. मतमोजणीच्या वेळी या कक्षात सहाय्यक निवडणूक अधिकारी, सुपरवायझर, सहाय्यक सूक्ष्म निरीक्षक, शिपाई, उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.

या ठिकाणी टपाली मतदानाची ही मतमोजणी होणार असून यासाठी स्वतंत्र कक्ष राहणार आहे. टपाली मतदानाअंतर्गत 80 वर्षापेक्षा अधिक आणि दिव्यांगाचे झालेले गृह मतदान, सुविधा केंद्रामध्ये झालेले मतदान तसेच सर्विस वोटर यांचे झालेले मतदान असे एकूण मतदान टपाली मतदाना अंतर्गत येत असून यांची मतमोजणी 04 जुनला सकाळी आठ वाजेपासून सुरू होणार आहे. या कक्षात असणाऱ्या सुविधांचा आढावा मतमोजणी निरीक्षकाने घेतला.

या इमारतीमध्ये निवडणूक निरीक्षक, मतमोजणी निरीक्षक आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांचेही कक्ष असतील. नियंत्रण कक्षातून सीसीटीव्ही माध्यमाच्याद्वारे मतमोजणी प्रक्रियेची पाहणी केली जाईल. या इमारतीत आरोग्य विषयी समस्या निर्माण झाल्यास आपातकालीन दवाखाना तयार करण्यात आला आहे.

इमारतीच्या बाहेरील परिसरात मीडिया कक्ष उभारला असून यामध्ये मोठ्या स्क्रीनच्या माध्यमातून मतमोजणीची प्रक्रिया दाखवण्यात येईल. तसेच माध्यम प्रतिनिधींना मोबाईल, लॅपटॉप, बॅटरी बॅकअप करण्यासाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध असेल. या कक्षाची निवडणूक निरीक्षकांकडून पाहणी केली. आवश्यक ठराविक अधिकाऱ्यांना सोडून कुणालाही मतमोजणी कक्षात मोबाईलची परवानगी दिलेली जाणार नाही.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles