Beed lokadalat

ताज्या बातम्या

 Beed lokadalat 3 कोटी 46 लाखांची 27 भूसंपादन प्रकरणे निकाली

By admin

February 12, 2023

 

 

बीड,

Beed lokadalat  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरून व मा . श्री . हेमंत शं . महाजन साहेब प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि . ११ फेब्रुवारी

२०२३ रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात भूसंपादन दाव्यांशी संबंधित २७ दावे सामोपचाराने निकाली निघून एकूण ३ कोटी ४६ लाखांची तडजोड करण्यात आली . वरील २७ प्रकरणांपैकी पाटबंधारे विभाग कृष्णा खोरे , उस्मानाबाद यांच्या

तहत येणा – या पांढरी साठवण तलाव ता . आष्टी येथील सर्वाधिक ११ प्रकरणे एकाच वेळी निकाली काढण्यात आली . यावेळी मा . प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री . एच . एस . महाजन यांच्या हस्ते लाभार्थ्यांना रू . ८० लाखांचा धनादेश

सूपूर्द करण्यात आला . lok adalat तसेच उर्वरित १६ भूसंपादन निकाली प्रकरणांमध्ये २ कोटी ६६ लाखांची तडजोड करण्यात आली .

याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश क . १ श्रीमती एस . आर . पाटील मॅडम , जिल्हा व सत्र न्यायाधीश क . ४ श्री . आर . एस . पाटील साहेब , बीड जिल्हा न्यायालयाच्या प्रबंधक सौ . एस . डी . देशपांडे मॅडम , पाटबंधारे विभाग कृष्णा खोरे

beed news live उस्मानाबादचे कार्यकारी अभियंता श्री . पालवनकर साहेब , जेष्ठ विधीज्ञ श्री . आर . बी . भंडारी साहेब , श्री . ए . डी . जगताप साहेब , पाटबंधारे विभागाचे विधीज्ञ श्री . देवगावकर साहेब यांची उपस्थिती होती .

सदरील लोक न्यायालयाच्या प्रसंगी मा . श्री . सिध्दार्थ ना . गोडबोले साहेब , सदस्य सचिव , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्यासह पॅनल विधीज्ञ , न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती .