beed holi dhulivandan donkey ride बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावात धुलीवंदन म्हणजेच धुळवड अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते.या दिवशी गावात मुक्कामास असलेल्या तरुणापासून ते वृद्ध जावयाला शोधून त्याची गावात गर्दभ सवारी घडवून आणली जाते. त्यानंतर त्याला मानपान देऊन सोडून दिले जाते.
जावयाची गर्दभ सवारी, 90 वर्षांपासूनची परंपरा कायम.
बीड शहरापासून साधारण 60 ते ७० किमी अंतरावर केज तालुक्यातील विडा हे गाव आहे. मोठी लोकसंख्या असलेल्या गावात हि गेल्या ९० वर्षापासूनची हि परंपरा सुरु आहे.धुलीवंदनाच्या दिवशी शोधून ठेवलेल्या जावयाला गाढवावर बसून मिरवणूक काढली जाते.
त्यासाठी अगोदरच्या दिवसापासून ही जावई शोध मोहीम सुरु असते. त्यामध्ये म्हातारा तरुण याचा विचार न करता जावई असणे आवश्यक असते. गावातील मंडळी उत्साहाने जावई शोध मोहिमेत सहभाग घेतात. शोधला, शोधला म्हणत अचानक एखाद्या जावयावर धाड टाकून पकडून ठेवले जाते. आणि दुसऱ्या दिवशी त्याची गर्दभ सवारी केली जाते.
हेही वाचा : मढी येथे ग्रामस्थ का नाही पेटवित होळी ?
गर्दभ सवारी कोणी केली परंपरा सुरु ?
अनंतराव देशमुख यांनी 90 वर्षांपुर्वी स्वतः च्या जावयाची चेष्टामस्करीत गाढवावरून मिरवणूक काढली होती तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. दरवर्षी आठ दिवस अगोदर पासूनच जावयाच्या शोधासाठी गावातील तरुण फिरत असतात. यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची मिरवणूक काढुन कपडे आणि सोन्याची अंगठी दिली जाते. मात्र यावर्षी सोन्याचे भाव वाढल्याने केवळ कपड्याचा आहेर जावयाला दिला जाणार आहे. स्व.अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीला सुरुवात झाली.
यंदाचा गर्दभ सवारीचा मान कोणाचा ?
holi 2026 यावर्षीचा मान शिवाजी गालफाडे या जावयाला मिळाला. गालफाडे हे मूळचे केज तालुक्यातील डोणगाव येथील रहिवासी आहेत. पण लग्नानंतर ते सासरवाडी विडा येथेच स्थायिक झाले. ते विडा गावातील बाबुराव दुनघव यांचे जावाई आहेत. गावात त्यांनी घर बांधले आहे. रोजंदारी करून ते चरितार्थ चालवतात. धुळवडीच्या दिवशीच तरुणांचा मोर्चा त्यांच्या घराकडे वळला आणि त्यांनी गदर्भराजवरून त्यांची मिरवणूक काढली. आपला या मिरवणुकीसाठी नंबर लागेल असे त्यांनीही वाटले नव्हते. रंगाची उधळण करत, गळ्यात जुन्या चप्पल-बुटांचा हार घालत गाढवावरून ही मिरवणूक काढली.